AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षण सर्व्हेबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या पुष्कर जोगला किरण मानेंनी सुनावलं; म्हणाले, तू तुझ्या…

Kiran Mane on Pushkar Jog Statement : अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून किरण माने यांनी पुष्कर जोगला सुनावलं आहे. किरण माने यांनी पोस्ट सध्या चर्चेत आहे. मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल... मापात राहा..., अशा शब्दात किरण माने यांनी पुष्करला इशारा दिलाय.

मराठा आरक्षण सर्व्हेबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या पुष्कर जोगला किरण मानेंनी सुनावलं; म्हणाले, तू तुझ्या...
| Updated on: Jan 30, 2024 | 12:10 PM
Share

मुंबई | 30 जानेवारी 2024 : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कागदपत्र पडताळणी केली जात आहे. शासनाकडून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेसाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जात माहिती घेत आहेत. मुंबई महापालिकेचे हे कर्मचारी अभिनेता पुष्कर जोग याच्या घरीही गेले होते. यानंतर पुष्करने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याने सोशल मीडियावर स्टोरी अपलोड केली. त्याच्या या संतप्त प्रतिक्रियेवरून पुष्करवर टीका केली जात आहे. अभिनेते किरण माने यांनी पुष्करला सुनावलं आहे. याबाबत किरण माने यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

“आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय…” मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो.

दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नांवाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.”

अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना???

लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा???

…मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या. बोल.

आहे दम तुझ्या पार्श्वभागात???

अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू??? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा.

मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा.

– किरण माने.

पुष्कर जोग याचं विधान काय?

पुष्कर जोग याने एक स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली. काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि सर्व्हे करतोय, म्हणून मला माझी जात विचारत होते. ते जर बाईमाणूस नसते तर 2 लाथ नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका. अदरवाईज, जोग बोलमार नाहीत. तर डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार, अशी पोस्ट पुष्करने शेअर केली. यावरून वाद निर्माण झाला आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.