Video : संजय राऊतांचा फोटो समोर येताच किरीट सोमय्या म्हणाले “मी साफसफाईला सुरूवात करतो”, पाहा व्हीडिओ…

झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे जुने सहकारी आणि दोस्त एकत्र आले.

Video : संजय राऊतांचा फोटो समोर येताच किरीट सोमय्या म्हणाले मी साफसफाईला सुरूवात करतो, पाहा व्हीडिओ...
किरीट सोमय्या, संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:39 PM

मुंबई : झी मराठीवरील (Zee marathi) किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे जुने सहकारी आणि दोस्त एकत्र आले. या कार्यक्रमात गप्पांसह काही विनोदही होतात. यात राजकीय मंडळींना गोत्यात आणणारे प्रश्नही विचारले जातात. या कार्यक्रमादरम्यान काही फोटो दाखवून त्या फोटोला पाहून मनात येणारं गाणं सांगायचं होतं. यात संजय राऊतांचा (Sanjay Raut) फोटो दाखवण्यात आला तेव्हा एकनाथ खडसे यांनी ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम’ हे गाणं गायलं तर किरीट सोमय्या यांनी थेट हातात फडकं घेत किचन पुसायला सुरूवात केली आणि म्हणाले, “मी साफसफाईला सुरूवात करतो!”, सोमय्या असं म्हणाले अन् एकच हश्या पिकला.

खडसेंकडून फडणवीसांना पुन्हा चिमटा

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांबाबात मात्र खडसेंचा सूर राजकीय आखाड्यात असतो तसाच दिसून आला. कारण देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवल्यावर खडसेंनी चक्क..दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे, दोस्त ने जिंदगीभर के लिये बदनाम किया रे, असे म्हणताच हशा पिकला. तर सोमय्यांनी फडणवीसांवर गाणं म्हणायलाच नकार दिला. त्यानंतर खडसेंना संजय राऊतांचा फोटो दाखवण्यात आला. त्यावेळी आ देखे जरा किसमे कितना है दम…हे गाणं गाताना दिसून आले. तर संजय राऊतांचा फोटो पाहताच सोमय्या म्हणाले मी साफ सफाईला सुरूवात केली आहे. यावेळी खडसेंनी जे ग्राऊंड लेव्हला काम केलं त्याला सोमय्या हे सलाम करताना दिसून आले. तसेच भाजपच्या मोठे होण्यात खडसेंचा मोठा वाटा आहे, असेही सोमय्या म्हणाले.

सोमय्यांसाबोत खडसेंनी गायली गाणी

या कार्यक्रमात एकाथ खडसे आणि किरीट सोमय्या या दोघांच्या दोस्तीबद्दल सांगताना एकत्र ये दोस्ती हम नहीं तोडेंग गाणं गाताना दिसून आले. तर किरीट सोमय्या यांना खडसे यावेळी सल्ले देतानाही दिसून आले. मी सोमय्यांना नेहमी जपून राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देत असतो, असे यावेळी खडसे म्हणाले. मला त्यांना सल्ला द्याचा अधिकार आहे. ते कधी जात्यात असतात तर कधी सुपात असता, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी, असे खडसे म्हणाले. तसेच आमची दोस्ती ही पस्तीस वर्षांची आहे, असेही खडसेंनी आवर्जून सांगितले. दीड वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदाच व्यासपीठावर भेटलो, असेही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Deepika Padukone कडून वयाच्या 12 व्या वर्षी लिहिलेली कविता शेअर, नेटकरी म्हणतात “आजही तू लहान बाळच आहेस!”

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : आलिया भटचा जन्म मुंबईचा, पण नागरिकत्व भारताचं नव्हे तर ‘या’ देशाचं

Mrunal Dusanis : लेकीच्या येण्याने बदललं मृणाल दुसानिसच्या घराचं रूप, शेअर केला खास व्हीडिओ…

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.