Rahul Vaidya Net Worth : महागड्या गाड्यांचा शौक, ‘बिग बॉस’ने पालटले नशीब, पाहा राहुल वैद्यचे नेटवर्थ किती?

राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे प्रतिभावान गायकांपैकी एक आहेत. राहुलची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे आणि याच कारणामुळे त्याचे चाहते त्याला प्रत्येक शोमध्ये त्याला खूप पाठिंबा देतात. राहुलने ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सत्रात स्पर्धक म्हणून भाग घेतला.

Rahul Vaidya Net Worth : महागड्या गाड्यांचा शौक, ‘बिग बॉस’ने पालटले नशीब, पाहा राहुल वैद्यचे नेटवर्थ किती?
Rahul Vaidya

मुंबई : राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे प्रतिभावान गायकांपैकी एक आहेत. राहुलची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे आणि याच कारणामुळे त्याचे चाहते त्याला प्रत्येक शोमध्ये त्याला खूप पाठिंबा देतात. राहुलने ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सत्रात स्पर्धक म्हणून भाग घेतला. राहुल हा शो जिंकला नसला, तरी त्याला खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर राहुलने आपले अल्बम काढण्यास सुरुवात केली.

राहुलची गाणी खूप आवडली आहेत. त्याच्या मैफिलीने चाहत्यांची गर्दीही आकर्षित केली आणि हेच कारण आहे की राहुल सर्वाधिक कमावणाऱ्या गायकांपैकी एक आहे. आज, राहुलच्या वाढदिवशी, आम्ही तुम्हाला गायकाचे नेटवर्थ, मानधन, घर आणि वाहने याबद्दल सांगणार आहोत…

लहान वयात कामाला सुरुवात

फार कमी लोकांना माहित आहे की राहुल लहानपणापासूनच कामाला लागला. त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही जाहिरातींमध्ये आपला आवाज दिला आहे. यानंतर राहुल इंडियन आयडॉल शोमध्ये सहभागी झाला. या शोच्या पहिल्या सत्रात राहुल सेकंड रनर अप होता.

राहुलने नंतर 2005 मध्ये ‘तेरा इंतजार’ हे गाणे गायले जे साजिद वाजिदनं संगीतबद्ध केलं होतं. या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय राहुलनं ‘एक लडकी अंजानी सी’ हे गाणं गायलं आणि अनेक अनप्लग्ड गाणीही गायली. बिग बॉस 14 मध्ये आल्यानंतर राहुलच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. या शोमुळे राहुलची लोकप्रियता झपाट्याने वाढली. या शोमध्ये राहुलने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केलं आणि दिशा शोमध्ये आली आणि राहुलचा प्रस्ताव स्वीकारला.

नेटवर्थ किती?

फिल्मिकच्या रिपोर्टनुसार राहुलचे नेटवर्थ 3 कोटींपर्यंत आहे. प्रत्येक रिअॅलिटी शोसाठी तो एक लाख रुपयांपर्यंत मानधन आकारतो. तो एका संगीत मैफलीसाठी आणि एका म्युझिक अल्बमसाठी काही लाखात मानधन घेतो.

घर

राहुलचे मुंबई, अंधेरी येथे एक आलिशान अपार्टमेंट आहे, ज्यामध्ये तो त्याची आई आणि आता पत्नी दिशा परमार यांच्यासोबत राहतो. याशिवाय राहुलचे नागपुरातही घर आहे.

कार

राहुलकडे अनेक लक्झरी वाहने आहेत, ज्यात ऑडी, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज सारख्या मोठ्या लक्झरी ब्रँडच्या वाहनांचा समवेश आहे.

बिग बॉसनंतर पालटले नशीब

गायक राहुल वैद्य ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून आला होता. राहुलला या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. रुबिना दिलैकने हा शो जिंकला असला, तरी राहुलने प्रेक्षकांची मने जिंकली. या शोनंतर राहुलची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढली. सध्या राहुल ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये दिसत आहे. रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या या शोमध्ये राहुल धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.

दिशासोबत वाढदिवस साजरा केला..

दिशा आणि राहुल या वर्षी जुलैमध्ये विवाहबद्ध झाले. लग्नानंतर राहुलचा हा पहिला वाढदिवस आहे आणि याच कारणामुळे दोघेही या सेलिब्रेशनसाठी मालदीवला गेले आहेत. लग्नानंतर दोघेही कामाच्या बांधिलकीमुळे फिरायला जाऊ शकले नव्हते. मालदीवला पोहोचल्यानंतर दोघेही तिथून फोटो शेअर करत आहेत.

दिशाचा वाढदिवसानिमित्त खास संदेश

दिशाने राहुलसोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना दिशाने लिहिले, ‘माझ्या आयुष्याभराच्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यात आल्याने मला खूप आनंद झाला आहे.’

हेही वाचा :

Birthday Special : चॉकलेट बॉय आहे राहुल वैद्य, दिशा परमारशी लग्न होण्यापूर्वी ‘या’ व्यक्तीसोबत जोडलं गेलं नाव

‘राधे श्याम’च्या सेटवर कलहाचा माहोल? प्रभास-पूजा हेगडेच्या चर्चित वादावर निर्माते म्हणतात…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI