Raju Srivastav Health | राजू श्रीवास्तव यांची तब्येत स्थिर, व्हेंटिलेटरवरून कधी काढणार?

रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचे सर्व कार्ये सध्या व्यवस्थित सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून हृदयाचे कार्य पूर्वीप्रमाणेच सामान्य झाले आहे. राजू श्रीवास्तव यांना बरे होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात.

Raju Srivastav Health | राजू श्रीवास्तव यांची तब्येत स्थिर, व्हेंटिलेटरवरून कधी काढणार?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Sep 04, 2022 | 8:25 AM

मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना एम्स रूग्णालयात दाखल होऊ आता जवळपास 24 दिवस उलटले आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सातत्याने चढ-उतार हे बघायला मिळतायंत. डाॅक्टरांची संपूर्ण टिम राजू यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे. इतकेच नाही तर राजूंच्या तब्येतीमध्ये (Health) सुधारणा व्हावी, याकरिता संपूर्ण देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. डॉक्टर आणि राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट देण्यात येतायंत. एएनआयच्या वृत्तानुसार, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या उपचारांना ते पूर्वीपेक्षा जास्त प्रतिसाद देत असल्याची देखील माहिती मिळते आहे. मात्र ते अजूनही व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत.

बरे होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचे सर्व कार्ये सध्या व्यवस्थित सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून हृदयाचे कार्य पूर्वीप्रमाणेच सामान्य झाले आहे. राजू श्रीवास्तव यांना बरे होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजू हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली आहेत. त्याचबरोबर राजू हे डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याची देखील माहिती मिळतयं.

हे सुद्धा वाचा

राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू…

10 आॅगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका राजू यांना आला होत्या. त्यानंतर ते जिममध्ये पडले. त्यानंतर थोडाही वेळ न घालवता त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून चांगल्या तब्येतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राजू यांना व्हेंटिलेटरवर लावण्यात आले असून राजू यांच्या तब्येतीसंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें