Khatron Ke Khiladi 12 : खतरों के खिलाडी शो TRP चार्टमध्ये अव्वल, रोहित शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानले सर्वांचे आभार…

शो TRP चार्टमध्ये पहिल्या स्थानावर कायम राहिल्यानंतर रोहित शेट्टीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीयं. रोहितने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "सर्वोच्च रेट केलेला भारतीय टीव्ही रिअॅलिटी शो गेल्या 4 आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे.

Khatron Ke Khiladi 12 : खतरों के खिलाडी शो TRP चार्टमध्ये अव्वल, रोहित शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानले सर्वांचे आभार...
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:59 AM

मुंबई : खतरों के खिलाडी 12 (Khatron Ke Khiladi 12) या रिअॅलिटी शोचा पहिला भाग 2 जुलै रोजी टीव्हीवर दाखवण्यात आला. खतरों के खिलाडी 12 ने त्यांचे अव्वल स्थान कायम राखून हा शो सुरुवातीपासून TRP चार्टमध्ये पहिल्या स्थानावर ठेवलायं. रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी हा भारतीय टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहिला जाणारा रिअॅलिटी शो (Reality show) बनला आहे. शो इतका हिट झाल्याबद्दल रोहित शेट्टीने सर्व प्रेक्षकांचे (Audience) आभार मानले आहेत. या शोमध्ये अत्यंत खतरनाक स्टॅट केले जातात. हे सर्व स्टॅट बघून माणसाच्या अंगावर काटा येतो. मात्र, हा सर्व शो रिअॅलिटी असल्याने या शोला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळते आहे.

रोहित शेट्टीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर केली शेअर

शो TRP चार्टमध्ये पहिल्या स्थानावर कायम राहिल्यानंतर रोहित शेट्टीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीयं. रोहितने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वोच्च रेट केलेला भारतीय टीव्ही रिअॅलिटी शो गेल्या 4 आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद #KhatronkeKhiladi” रोहित शेट्टीची पोस्ट प्रेक्षकांना आवडली आहे. सध्या रोहितसोबत काम करत असलेला बॉलिवूड अभिनेता सिद्धांत मल्होत्रा ​​याने सर, आपने तो कमाल कर दिया म्हणत कमेंट केलीयं.

हे सुद्धा वाचा

खतरों के खिलाडी शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत केले

रुबिना दिलैक, प्रतीक सहजपाल, सृती झा, शिवांगी जोशी, अनेरी वजानी, जन्नत जुबेर, तुषार कालिया, मोहित मलिक, निशांत भट, राजीव अदातिया, मिस्टर फैसू, चेतना पांडे, एरिका पॅकार्ड आणि कनिका मान यावर्षी ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये सहभागी झाले होते. या शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत केले जात होते, जे आता संपले असून, सर्व स्पर्धक भारतात परतले आहेत. शोच्या विजेत्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.