AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 Winner : रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती! 

बिग बॉस 14' (Bigg Boss 14) चा आज महाअंतिम सोहळा संपन्न झाला. रुबीना दिलैक ही बिग बॉस सीझन 14 ची विजेती ठरली आहे.

Bigg Boss 14 Winner : रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती! 
| Edited By: | Updated on: Feb 22, 2021 | 1:16 AM
Share

मुंबई :बिग बॉस 14′ (Bigg Boss 14) चा आज महाअंतिम सोहळा संपन्न झाला. अभिनेता सलमान खानने बिग बॉस सीझन 14 च्या विजेत्याची घोषणा केली. रुबीना दिलैक ही बिग बॉस सीझन 14 ची विजेती ठरली आहे. या सीझनचा विजेता कोण असेल? याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट पाहत होते. मात्र, आज अखेर बिग बॉस सीझन 14 चा विजेता घोषित करण्यात आला. (Rubina Dilaik Bigg Boss 14 winner)

बिग बॉस सीझन 14 च्या महाअंतिम सोहळ्याची सलमान खानने आपल्या शैलीत सुरुवात केली होती. सुरूवातीला सर्व स्पर्धकांचे मजेशीर किस्से दाखवण्यात आले. सर्व स्पर्धकांच्या नातेवाईकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. सलमान खानने सर्वांचे स्वागत केले. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे ‘यमला पगला दिवाना’ या गाण्याने बिग बॉसच्या अंतिम सोहळ्यात स्वागत करण्यात आलं.

महाअंतिम सोहळ्यात सुरूवातीला राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बेघर झाली. राखी 14 लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. ज्यावेळी राखी घराबाहेर पडली त्यावेळी सलमानने राखीला विचारले, तुला काय वाटते बिग बॉस कोण जिंकेल? त्यावेळी राखीने रूबीनाचं नाव घेतलं होतं.

राखीनंतर अली गोनी हा कमी  वोट मिळाल्यामुळे बिग बॉसच्या घरातून  बाहेर पडला. विशेष म्हणजे अली घराबाहेर पडल्यानंतर घरातील सदस्यांनादेखील मोठा धक्का बसला. अली गोनीनंतर निक्की तांबोळी घराबाहेर पडली. त्यानंतर बिग बॉस 14 ची विजेता म्हणून रुबीना दिलैकच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला.

चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार? हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला, त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत होते, म्हणजेच जरी बिग बॉस 14 ची विजेती म्हणून बिग बॉसने आज रुबीनाच्या नावाची घोषणा केली असली तरी देखील गुगलने बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषणा आधीच केली होती.

केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटतं होते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली होती. आणि खरोखरच आज रुबीनाच बिग बॉस 14 विजेती ठरली आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14चा आज महाअंतिम सोहळा, कोण होणार विजेता?, कसा असेल सोहळा; वाचा!

Bigg Boss 14 Grand Finale Latest Promo: महाअंतिम सोहळा ग्रँड होणार, धर्मेंद्र, रितेश आणि नोरा फत्तेही खास गेस्ट!

(Rubina Dilaik Bigg Boss 14 winner)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.