Video | ‘या’ लोकप्रिय मराठी गाण्यात दिसला होता ‘दया बेन’चा बोल्ड लूक, तुम्ही पाहिलंत का?

सध्या दिशा वाकानी मालिकेत दिसत नसली तरी तिची फॅन फॉलोविंग अजिबात कमी झालेली नाही. बाळाच्या संगोपनासाठी दिशा या शोपासून दूर झाली होती. मात्र, तिचे चाहते आजही तिच्या बाबतील अपडेट मिळवण्याचे प्रयत्न करत असतात.

Video | ‘या’ लोकप्रिय मराठी गाण्यात दिसला होता ‘दया बेन’चा बोल्ड लूक, तुम्ही पाहिलंत का?
दिशा वाकानी


मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या कॉमेडी शोच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली. विशेषत: या शोमध्ये ‘दया बेन’ची भूमिका साकारणारी दिशा वाकानीने (Disha Vakani) आपल्या अनोख्या स्टाईलने सर्वांचेच मनोरंजन केले होते. या मालिकेमुळे तिला घरोघरी विशेष ओळख मिळाली होती (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame dayaben aka Disha Vakani Bold dance goes viral).

सध्या दिशा वाकानी या मालिकेत दिसत नसली तरी तिची फॅन फॉलोविंग अजिबात कमी झालेली नाही. बाळाच्या संगोपनासाठी दिशा या शोपासून दूर झाली होती. मात्र, तिचे चाहते आजही तिच्या बाबतील अपडेट मिळवण्याचे प्रयत्न करत असतात.

शोमध्ये दिसायची साधी-भोळी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये दिशा वाकानी एका आदर्श पत्नी, सून आणि आईच्या भूमिकेत दिसली आहे. या शोमध्ये ती नेहमी साडी नेसून, लांब वेणी किंवा आंबाडा अशा सध्या-सोज्वळ वेशात दिसली होती. तथापि, अलिकडच्या काळात तिने हा शो आणि टीव्हीच्या जगापासूनच अंतर राखले आहे.

अशा परिस्थितीत तिचे चाहतेसुद्धा तिला खूप मिस करत. दरम्यान, आता दिशा वाकानी उर्फ ​​दया बेनचा असा एक व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

बोल्ड अवतारात दिसली दयाबेन

वास्तविक, अलीकडेच एका फॅन क्लबने दिशाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती एका अत्यंत बोल्ड अवतारात दिसली आहे. तिचा हा लूक पाहून आता तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये दिशा कोळी स्टाईलमध्ये मराठी कोळी गीत ‘दर्या किनारे एक बंगला’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर चर्चेत आलाय व्हिडीओ

या गाण्यात दिशाने गोल्डन कलरचा बॅकलेस टॉप परिधान करुन, खूपच बोल्ड डान्स केला आहे. आता दयाबेनचा हा अवतार सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. दिशा वाकानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ :

(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame dayaben aka Disha Vakani Bold dance goes viral)

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या निधनाला वर्ष पूर्ण, चौकशी अद्याप सुरु! CBI अधिकाऱ्यांकडून सुशांत प्रकारणाची अपडेट

Photo : बॅक टू ब्लॅक म्हणत शॉर्ट स्कर्टमध्ये हुमा कुरेशीचा बोल्ड अवतार, पाहा फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI