AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची आत्महत्या, वयाच्या 28 व्या वर्षी गळफास

विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स मालिकेतील चित्राची व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती

प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची आत्महत्या, वयाच्या 28 व्या वर्षी गळफास
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 09, 2020 | 9:19 AM
Share

चेन्नई : दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज (VJ Chitra Kamraj) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते हादरले आहेत. (Tamil TV serial actress and anchor chithra committed suicide)

हॉटेलमध्ये गळफास

चेन्नईतील नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. या हॉटेलमध्येच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपतीसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला होता.

विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स (Pandian Stores) या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातच चित्राने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय, सहकलाकार आणि फॅन्सही धक्क्यात आहेत.

नैराश्यातून आत्महत्येची चर्चा

चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येच्या काही तास आधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि स्टोरीही शेअर केले होते. त्यानंतर तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेवटची इन्स्टाग्राम स्टोरी

अँकर म्हणून यशस्वी कारकीर्द

चित्राने 2013 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी अँकर म्हणून कारकीर्द सुरु केली. व्हीजे चित्रा म्हणून तिने मनोरंजन विश्वात नाव कमावलं. सुरुवातीला तिने अनेक तामिळ टीव्ही कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं होतं.

मन्नन मंगल मालिकेतून चित्राने मालिका विश्वात पाऊल ठेवलं, तिने केलेल्या मोजक्या मालिकांपैकी वेलुनाची मालिकेतील तिची मुख्य भूमिका गाजली होती. याशिवाय चिन्ना पापा पेरिया पापा, डार्लिंग डार्लिंग अशा काही मालिकाही तिने केल्या.

चित्रा उत्तम नृत्यांगनाही होती. ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. जोडी अनलिमिटेड या शोमध्ये ती उपविजेतेपद पटकावलं होतं.

चित्राची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Chitra kamaraj (@chithuvj)

संबंधित बातम्या :

अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन, कोरोनामुळे संपली आयुष्याची लढाई

(Tamil TV serial actress and anchor chithra committed suicide)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...