AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शीजान खान याचे कुटुंबिय तुनिशा शर्मा हिला चुकीची औषधे देत असल्याचा मोठा दावा

तुनिशाच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये तुनिशासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याला पोलिसांनी अटक केली.

शीजान खान याचे कुटुंबिय तुनिशा शर्मा हिला चुकीची औषधे देत असल्याचा मोठा दावा
| Updated on: Jan 11, 2023 | 7:49 PM
Share

मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केलेली टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशाच्या आत्महत्येनंतर आरोप-प्रत्यारोपाचे जे सत्र सुरू झाले ते असून थांबण्याचे नाव घेत नाहीये. तुनिशा हिने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये तुनिशासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याला पोलिसांनी अटक केली.

तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तुनिशा आणि शीजान खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 15 दिवस अगोदर यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. यामुळेच तुनिशा तणावामध्ये होती.

तुनिशाच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर शीजान खान याच्या कुटुंबाने देखील तुनिशा शर्मा हिच्या आईवर काही आरोप केले. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

आता तुनिशा शर्मा हिच्या वकिलाने शीजान खान याच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत म्हटले की, शीजान खान याचे कुटुंबिय हे तुनिशाला चुकीची आैषधे देत होती. जयपुरच्या कोणत्यातरी डाॅक्टरांनी ही आैषधे दिल्याचे सांगितले होते.

मुळात म्हणजे तुनिशा शर्मा ही डिप्रेशनमध्ये नव्हती. शीजान खान याचे वकील तुनिशा ही डिप्रेशनमध्ये होती हे सांगून प्रकरण वेगळ्या मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

शीजान खान याच्या कुटुंबियांसोबत असलेल्या फोटोंवरून कुठेच वाटत नाही की, तुनिशा ही डिप्रेशनमध्ये होती. तुनिशा हिच्यावर शीजान खान याच्या कुटुंबियांना नियंत्रण मिळवायचे होते, असे वकिलाने म्हटले आहे.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.