बिग बॉस 19 मध्ये सर्वांमध्ये हा स्पर्धक आहे गडगंज श्रीमंत; ज्याचे कोट्यावधींचे साम्राज्य
बिग बॉस 19 मधील स्पर्धकांची चर्चा होत आहे. त्यांचा खेळही आता प्रेक्षकांना आवडू लागला आहे. बिग बॉस 19मध्ये सर्वात श्रीमंत स्पर्धक माहितीये कोण आहे? ज्याचे करोडोंच्या संपत्तीचे साम्राज्य आहे.

बिग बॉस 19 मध्ये आता एक एक रंजक वळण येताना दिसत आहे. स्पर्धकांचे बदलणारे रुपही समोर येत आहे. प्रत्येकाची खेळाची स्टाईल बदलताना दिसतेय. तसेच प्रेक्षकही आता स्पर्धकांचा खेळ, भांडण एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान घरातील प्रत्येक स्पर्धाकाची घरात जशी एक ओळख आहे त्याचपद्धतीने बाहेरच्या जगात मात्र त्यांची ओळख, त्यांचे काम हे फार वेगळे आहे. अनेकांचे लक्ष्य वेगळे आहे.प्रत्येकाची खऱ्या आयुष्यातील एक बाजू आहे. जी कदाचितच कोणाला माहित असते.
प्रत्येक स्पर्धक त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीने इथपर्यंत पोहोचला आहे. पण या सर्व स्पर्धकांपैकी एक असा स्पर्धक आहे जो सर्वात जास्त श्रीमंत स्पर्धक मानला जातो. त्याचे कोट्यावधींचे साम्राज्य आहे. हा स्पर्धक आहे अमाल मलिक.
बिग बॉसच्या घरातील सर्वात श्रीमंत स्पर्धक
बिग बॉस 19 मधला स्पर्धक अमाल मलिकचीही बरीच चर्चा होताना दिसत आहे. आता हळू हळू अमाल त्याचा खेळ सुधारताना दिसत आहे. प्रेक्षकही आता त्याचा खेळ एन्जॉय करताना दिसत आहेत. अमाल त्याच्या कुटुंबाशी असलेल्या मतभेदांमुळे चर्चेत होता. आता, तो त्याची प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा त्याची जी सकारात्मक बाजू आहे ती दाखवण्याचा बिग बॉसच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न करताना दिसतोय. अमाल मलिक बिग बॉस 19 मध्ये चाहत्यांची मने जिंकत आहे.
View this post on Instagram
बिग बॉस 19 साठी दर आठवड्याला अंदाजे 8.75 लाख मानधन आकारतो
अमाल मलिक एका फिल्मी कुटुंबातून येतो. तो सध्या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, अमाल बिग बॉस 19 साठी दर आठवड्याला अंदाजे 8.75 लाख शुल्क आकारत आहे. यामुळे त्याला त्याच्या संगीत कारकिर्दीव्यतिरिक्त उत्पन्नाचा आणखी एक स्रोत मिळाला आहे. अमालचा मुंबईत 2-बीएचके फ्लॅट असून डिझायनर मानसी सेठना पांडे यांनी तो डिझाइन केला आहे. अमालकडे ऑडी क्यू7 आणि मर्सिडीज बेंझसह मोठ्या प्रमाणात कार कलेक्शन आहे.
375 करोड ते 430 करोडची संपत्ती
अमाल मलिकच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, 2025 पर्यंत त्याची एकूण संपत्ती सुमारे 375 करोड ते 430 करोड असण्याचा अंदाज आहे. तो बॉलिवूड चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करून, पार्श्वगायन, ब्रँड एंडोर्समेंट, गाण्यांचे रॉयल्टी आणि लाईव्ह परफॉर्मन्स या माध्यमातून भरपूर उत्पन्न मिळवतो. शिवाय, त्याने नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्याच्या कठोर परिश्रमाने तो केवळ एक यशस्वी संगीतकारच नाही तर तरुण पिढीसाठी प्रेरणास्थानही बनला आहे.
