‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत लगीनघाई; मानसी-रणजीतच्या लग्नात तेजसचा उखाणा
Thod Tuz Thod Maz Serial : स्टार प्रवाहच्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेत लगीनघाई सुरु आहे. मानसीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता खरंच मानसी आणि रणजीतचं लग्न होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या या लोकप्रिय मालिकेत मानसीच्या लग्नाची लगबग सुरु झालीय. खरंतर आपल्या मुलीने शिकून स्वावलंबी व्हावं, तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलींसाठी खूप स्वप्न पाहिली आहेत. त्यांचंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. मानसीच्या लग्नाची लगबग मालिकेत पाहायला मिळत आहे.
मानसी-रणजीतच्या लग्नात तेजस उखाणा
रणजीत आणि मानसीच्या लग्नात एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. रणजीत- मानसीच्या तेजस उखाणा घेतो. रणजीतला सगळेच जण उखाणा घ्यायला सांगतात. पण त्याची तयारी नसल्यानं तो टाळाटाळ करतो. मात्र यावेळी तेजस त्याला मदत करतो. तेजस रणजीतला उखाणा सांगतो. अन् मग रणजीत उखाणा घेतो. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं करत करू सुखाचा संसार, आजपासून दिला मानसीच्या हाती सगळा कारभार’ असा उखाणा तेजस रणजीतला सांगतो.
View this post on Instagram
मानसी करणार बाबांचं स्वप्न पूर्ण
वीट भट्टीतला कामगार ते वीटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी अनुभवला आहे. त्यामुळे आपण जे भोगलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटतं. म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेलं खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधलं आहे. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजीतसोबत लग्न करण्यास तयार झालीय.
मानसीने आजवर स्वत:च्या आनंदाचा कधीही विचार केला नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारुन जगतोय हेही तिच्या लक्षात येत नाही. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेचं मानसीचं ध्येय आहे. तिने स्वत:साठी कधी स्वप्नं पाहिलंचं नाही. त्यामुळेच प्रेम काय लग्नानंतरही होईल असं तिचं मत आहे. मानसीने लग्न करण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणार आहे. कसा असेल मानसीचा यापुढील प्रवास? हे जाणून घेण्यासाठी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका पाहावी लागेल.
