Tu Tevha Tashi: माई मावशी-वल्लीची ऑफस्क्रीन धमाल; मावशी जोमात, बाकी सगळे कोमात!
ऑन-स्क्रीन जरी या दोघी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांची धमाल चालू असते आणि त्यांचा पुरावा म्हणजे अभिज्ञा भावे सोशल मीडियावर शेअर करतात असलेले मजेशीर व्हिडीओ.

माई मावशी आणि वल्लीची ऑफस्क्रीन धमालImage Credit source: Tv9
झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी आणि त्यांच्या फुलणार प्रेम तर प्रेक्षकांना आवडतंच आहे. पण त्याचसोबत या मालिकेत एक जोडी अशी आहे ज्यांची नोकझोक सतत चालू असते ते म्हणजे माई मावशी (Ujjwala Jog) आणि वल्ली (Abhidnya Bhave). ऑन-स्क्रीन जरी या दोघी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांची धमाल चालू असते आणि त्यांचा पुरावा म्हणजे अभिज्ञा भावे सोशल मीडियावर शेअर करतात असलेले मजेदार व्हिडीओज. अभिज्ञा सेटवरील मजा-मस्ती व्हिडिओजच्या रूपात आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकीतच सोशल मीडियावर माई मावशी आणि वल्ली यांचा एक मजेदार व्हिडिओ प्रेक्षकांनी पाहिला आणि हसून हसून लोटपोट झाले.
या व्हिडिओमध्ये अभिज्ञा लाली मावशींना म्हणते कि “अहो मावशी आपल्या समोरच्या चाळीचे मालक कोमात गेले.” त्यावर मावशी मिश्कीलपणे म्हणतात, “श्रीमंत माणसं, मनाला वाटेल तिकडे जातात हो.” वल्ली आणि मावशी या स्क्रीनवर जरी एकमेकांशी वाद घालत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांचं बॉण्डिंग खूपच चांगलं आहे आहे हे त्यांच्या ऑफस्क्रीन चाललेल्या धमाल मजा मस्ती वरून कळून येतं.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
20 मार्चपासून ही मालिका सुरू झाली असून यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं. ही भूमिका अभिनेत्री उज्वला जोग अगदी चोख साकारत आहेत. उज्वला जोग यांना अभिनय क्षेत्रात लाली मावशी या नावाने ओळखलं जातं. त्यांना माई मावशी या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.
