AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राणा दा’चा फिटनेस फंडा; शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातही अशा पद्धतीने करतो व्यायामाचं नियोजन

'तुझ्यात जीव रंगला'मधील राणा असो किंवा 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील सिद्धार्थ.. हार्दिक (Hardeek Joshi) फक्त अभिनयानेच त्या भूमिका आत्मसात करत नाही तर त्या भूमिकेला अनुसरून आपली शरीरयष्टी आणि देहबोली याकडेदेखील तितकाच लक्ष देतो.

'राणा दा'चा फिटनेस फंडा; शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातही अशा पद्धतीने करतो व्यायामाचं नियोजन
Hardeek JoshiImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2022 | 11:30 AM
Share

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) हा प्रेक्षकांचा आवडता आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणा असो किंवा ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील सिद्धार्थ.. हार्दिक फक्त अभिनयानेच त्या भूमिका आत्मसात करत नाही तर त्या भूमिकेला अनुसरून आपली शरीरयष्टी आणि देहबोली याकडेदेखील तितकाच लक्ष देतो. व्यस्त दिनक्रमातून त्याच्या आरोग्याची काळजी तो कशी घेतो याबद्दल हार्दिकने सांगितलं. (Fitness Funda)

हार्दिक म्हणाला, “खरं तर आजच्या काळात आरोग्याची काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि मुळात मी फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे दैनंदिन मालिका करताना आपल्याला स्वतःसाठी वेळ काढावा लागतो हे खरं आहे, त्यामुळे मी जरी मी मालिका करत असलो तरी मी जसा वेळ मिळेल तसं जिमला जातो. शिफ्टच्या आधी किंवा नंतर दीड ते दोन तास वर्कआउट करतो. जर अगदीच वेळ अॅडजस्ट होत नसेल तर सीनच्या मध्ये जर फावला वेळ असेल तर अराम न करता मी तेव्हा जिमला जातो आणि परत येऊन शूटिंग करतो. माझ्यासाठी फिटनेस खूप महत्वाचं आहे. मी अभिनय क्षेत्रात आहे म्हणून नाही तर वैयक्तिक आयुष्यात देखील फिटनेस खूप महत्वाचा आहे सर्वांसाठीच. कारण जर आपण फिट असू तर आयुष्य हिट आहे असं मी नेहमी म्हणतो.”

इन्स्टा पोस्ट-

हार्दिकचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या चाहत्यांसाठी तो नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. कॉलेजमध्ये असताना हार्दिक मॉडेलिंग करायचा. पण त्यात करिअर करण्याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. त्याला आर्मीत करिअर करायचं होतं. 2011 मध्ये त्याची आर्मीत निवडही झाली होती. त्यावेळी चंदीगडमध्ये एसएसबीचं (सशस्त्र सीमा दल) ट्रेनिंगही त्यानं पूर्ण केलं होतं. पण काही कारणामुळे त्याला कॉल आला नाही. मात्र, अजूनही आर्मीत जाण्याची माझी इच्छा आहे, असं हार्दिक म्हणतो.

हेही वाचा:

Dharmaveer: “जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं”; आनंद दीघेंवरील चित्रपटाचा दमदार टीझर

VIDEO: कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का? एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.