Tuzech Mi Geet Gaat Aahe: …अन् ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान कलाकार झाले भावूक

या भावनिक प्रसंगासाठी एक गाणंही चित्रित करण्यात आलं आहे. दीप्ती सुर्वेने या गाण्याचे शब्द लिहिले असून रोहन रोहन या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं आहे.

Tuzech Mi Geet Gaat Aahe: ...अन् 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या शूटिंगदरम्यान कलाकार झाले भावूक
Tuzech Mi Geet Gaat AaheImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:15 AM

कोण देणार न मले हात ग उशाला आई, परतून निघन्याची एवढी कशाला घाई? दिवसाच्या उजेडात जनू चांदवा रुसला, रात व्हते घाबरतो जीव माझा चिमुकला. अशावेळी तुझा आई हात सोडवत नाई, परतून निघन्याची एवढी कशाला घाई? आईला गमावल्यानंतर चिमुकल्या स्वराच्या (Swara) मनाची अवस्था काहीशी अशी झालीय. आईचा जीव वाचवण्यासाठी स्वराने बरेच प्रयत्न केले. पण आपल्या आईचा जीव ती वाचवू शकली नाही. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेतील हे अत्यंत भावनिक वळण आहे. मालिकेत हा भावनिक प्रसंग शूट करणं संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होतं. सेटवर हा प्रसंग शूट करताना सगळेच भावूक झाले होते.

चिमुकल्या स्वरानेही हा सीन साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली. या भावनिक प्रसंगासाठी एक गाणंही चित्रित करण्यात आलं आहे. दीप्ती सुर्वेने या गाण्याचे शब्द लिहिले असून रोहन रोहन या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं आहे. आईला गमावल्यानंतर स्वराचा पुढील प्रवास कसा असेल, तिची आणि तिच्या वडिलांची भेट होणार का, स्वराची गाण्याची आवड कशी पूर्ण होणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून मिळतील. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेच्या या कथानकासोबतच अभिनेत्री उर्मिला कोठारे मालिकेचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. तब्बल 12 वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला कोठारेने ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून पुनरागमन केलं. उर्मिलाच्या एग्झिटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसून प्रोमो पाहिल्यानंतर मालिकेतील तिची भूमिका संपुष्टात आल्याचं समजतंय. अवघ्या काही दिवसांतच उर्मिला ही मालिका सोडणार असल्याने चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केला आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात उर्मिला वैदेही हे पात्र साकारत असून ती स्वराच्या आईच्या भूमिकेत आहे.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.