इन्स्टा फ्रेंडवर वॉशरुममध्ये रेप… बड्या अभिनेत्याला अटक; अख्खं बॉलिवूड हादरलं
Ashish Kapoor Arrested : टीव्ही अभिनेता आशीष कपूर याच्यावर पीडितेने गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता आशिष कपूर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आशिष कपूर याला पोलिसांकडून पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आशिष कपूर याच्यावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिषने ऑगस्ट महिन्यात वॉशरुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेने अभिनेत्यावर नक्की काय आरोप केलेत तसेच हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.
ऑगस्टमधील दुसर्या आठवड्यात दिल्लीत हाऊस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या हाऊस पार्टीत अभिनेत्याने वॉशरुममध्ये अत्याचार केल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आशिष कपूरला पुण्यातून अटक केली आहे.
नक्की प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आशिष कपूर या दोघांची इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचं मैत्रीत रुपांतर झालं. त्यानंतर आशिषने या पीडितेला हाऊस पार्टीसाठी बोलावलं. या प्रकरणी पोलिसांनी आशिष कपूरसह, त्याचा मित्र, मित्राची पत्नी आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
आधी आरोप मग घूमजाव
पीडितेने आरोप केल्यानंतर शब्द फिरवले. आशिष कपूर यानेच फक्त अत्याचार केल्याचं पीडितेने म्हटलं. या सर्व घटनेचा व्हीडिओ काढल्याचा दावाही पीडितेने केला. मात्र पोलिसांना कोणताच व्हीडिओ मिळाला नाही. तसेच वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर आशीष कपूर याच्या मित्राच्या पत्नीने मारहाण केल्याचा आरोपही पीडितेने केला. मात्र अभिनेत्याच्या मित्राच्या पत्नीनेच आम्हाला कॉलद्वारे आमच्याशी संपर्क साधल्याचं (PCR Call) पोलिसांनी म्हटलं.
आशीष कपूर याच्याबाबत थोडक्यात
आशिषने अल्पावधीतच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेषकांच्या मनात आपलं स्थान मिळवलं. आशिषने छोट्या पडद्यासह सिनेमातही आपली छाप सोडली आहे. आशिषने इनकार, कुर्बान, टेबल नंबर 21, या आणि यासारख्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
तसेच आशिष ‘सात फेरे’, ‘देखा एक ख्बाव’ या मालिकांमधून घराघरात पोहचला. आशिष हा को स्टार अर्थात सहकारी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा 2016 मध्ये रंगली होती. या दोघांनी एकमेकांना 4 वर्ष डेट केलं. मात्र त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता.
