मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला… वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्द

मी त्याला शिक्षा देऊ शकते. पण कायदा आणि परमेश्वर त्याला अधिक चांगली शिक्षा देईल याची मला आशा आहे. या सर्व प्रकारात मला माझ्या आईवडिलांना अधिक त्रस्त होताना पाहायचे नाहीये.

मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला... वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्द
मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला... वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्दImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 11:03 AM

इंदौर: अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) आत्महत्या प्रकरणाचे एकामागून एक रहस्य उलगडू लागले आहे. या धक्कादायक खुलाशामुळे सर्वच हैराण झाले आहेत. दुसरीकडे हे खुलासे तिच्या चाहत्यांना भावनिकही करत आहेत. वैशालीच्या आत्महत्येनंतर तिच्या घराबाहेर सुसाइड नोट सापडली होती. शेजारी राहत असलेला राहुल हा तिच्या आत्महत्येला (suicide) जबाबदार असल्याचं त्यात म्हटलं आहे. पोलिसांनी ही सुसाइड नोट मिळताच राहुल आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. या सुसाइड नोटची (suicide note) काही पानं व्हायरलही झाली आहेत. त्यात वैशालीने तिचं दु:ख सांगितलं आहे. तिचे हे शब्द काळजाला चिर पाडणारे असेच आहेत.

आता तू कुणाशी भांडणार आहेस? मी तर त्याचा स्वीकार केला होता. त्याने तर मला परकं समजलं. शेवटी मितेश सोबतच्या नात्यामुळे मी आनंदी झाले होते. पण त्याने तेही तोडले. मी खूप थकलेय. आता मला काहीच नकोय. राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलंय. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणारच, असं वैशालीने या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

मी त्याची पत्नी दिशाचं नावही घेईल. नवऱ्याचं वास्तव माहीत असूनही सर्वांसमोर ती मला चुकीचं ठरवत असते. कारण तिला तिचा संसार टिकवायचा होता. आपलं काहीच नुकसान झालं नाही, असं वाटल्याने राहुलने त्याचा फायदा उचलला. पण माझं आयुष्य तर बर्बाद झालं, असं ती या चिठ्ठीत पुढे म्हणते.

सुसाइड नोट

सुसाइड नोट

मी त्याला शिक्षा देऊ शकते. पण कायदा आणि परमेश्वर त्याला अधिक चांगली शिक्षा देईल याची मला आशा आहे. या सर्व प्रकारात मला माझ्या आईवडिलांना अधिक त्रस्त होताना पाहायचे नाहीये, असं ती म्हणते. तिच्या या शेवटच्या शब्दातून तिच्या मनातील वेदना स्पष्टपणे दिसून येतात.

आपलं आयुष्य बरबाद करणाऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे, असा टाहो ती या चिठ्ठीतून फोडताना दिसत आहे. याच चिठ्ठीत तिने राहुल आणि दिशाला शिक्षा मिळेल तेव्हाच आपल्या आत्म्याला शांती मिळेल असं म्हटलं होतं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.