वनिता खरात हिचा लिपलॉकचा फोटो पाहून चाहते हैराण, चर्चांना उधाण, या व्यक्तीसोबत रोमँटिक फोटोशूट

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 8:04 PM

वनिता खरात हिच्या फोटोशूटनंतर अनेकांनी तिच्यावर टीका करण्यासही सुरूवात केली होती. मात्र, यादरम्यान अनेकांनी तिचे काैतुकही करण्यात आले होते.

वनिता खरात हिचा लिपलॉकचा फोटो पाहून चाहते हैराण, चर्चांना उधाण, या व्यक्तीसोबत रोमँटिक फोटोशूट

मुंबई : वनिता खरात हिने काही दिवसांपूर्वी अत्यंत बोल्ड फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. वनिताने तिच्या करिअरमध्ये फक्त मराठीच नाहीतर बाॅलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये जबरदस्त अशी भूमिका केलीये. वनिता खरात (Vanita Kharat) कधीच तिच्या वजनाचे न्यूनगंड न बाळतगता कायमच बोल्ड फोटोशूट करते. वनिता खरात तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. गेल्याच वर्षी वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट (Photoshoot) करत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या फोटोशूटनंतर अनेकांनी तिच्यावर टीका करण्यासही सुरूवात केली होती. मात्र, यादरम्यान अनेकांनी तिचे काैतुक करत हे करण्यासाठी देखील धैर्य लागते म्हटले होते. आता परत एकदा वनिता खरात चर्चेत आलीये.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून वनिता खरात ही प्रत्येक घरापर्यंत पोहचली आहे. आज वनिता खरात हिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. विशेष म्हणजे शाहिद कपूर याच्या एका चित्रपटामध्ये वनिता खरात हिने महत्वाची भूमिका देखील बजावली आहे.

सध्या सोशल मीडियावर वनिता खरात हिचा लिपलॉक करतानाचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमुळे आता विविध चर्चांना उधाण देखील आले असून या फोटोवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Vanita kharat

वनिता खरात हिचा जो लिपलॉक करतानाचा फोटो व्हायरल होतोय. तो तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटमधील फोटो असल्याचे सांगण्यात येतंय. होय…वनिता खरात ही लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे.

वनिता खरात हिचे लग्न 2 फेब्रुवारीला असून लग्नाची जय्यत तयारी देखील सुरू आहे. वनिता खरात हिच्या लग्नाला अवघे अकरा दिवस उरले आहेत. वनिता खरात ही सुमित लोंढे याच्यासोबत सात फेरे घेणार आहे.

वनिता खरात हिचा लिपलॉकचा फोटो व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला होता. मात्र, नंतर कळाले की, हा तिचा होणारा नवरा असून यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे.

शाहिद कपूर याचा चित्रपट कबीर सिंह या चित्रपटामध्ये वनिता खरात हिची झलक बघायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिचा फक्त आणि फक्त एकच सीन होता. मात्र, हा एकच सीन हीट ठरलाय.

सध्या सोशल मीडियावर वनिता खरात हिच्या प्री-वेडिंगचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे फोटो रोमँटिक देखील आहेत. वनिता कायमच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI