आधी ‘आनंदी’ आता ‘शिव’ही गेला, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर का पहिला जातोय ‘बालिका वधू’चा ‘तो’ एपिसोड?

लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांच्या अकाली निधनानंतर सोशल मीडियावरही चाहते शोक व्यक्त करत आहे. त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

आधी ‘आनंदी’ आता ‘शिव’ही गेला, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर का पहिला जातोय ‘बालिका वधू’चा ‘तो’ एपिसोड?
सिद्धार्थ आणि प्रत्युषा

मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांच्या अकाली निधनानंतर सोशल मीडियावरही चाहते शोक व्यक्त करत आहे. त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) या हिंदी मालिकेमुळे सिद्धार्थ शुक्ला प्रसिद्धी झोतात आला होता. आता त्याच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा त्याच्या ‘बालिका वधू’ या मालिकेतील एपिसोड 1157 (Balika Vadhu Episode 1157 ) मधील आहे.

त्यात सिद्धार्थ शुक्ला आणि त्याची सहकलाकार प्रत्युषा बॅनर्जी होती. प्रत्युषाने देखील 2016 मध्ये आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले होते. आता प्रत्युषा देखील या चर्चित एपिसोडमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ शुक्ला साकारत असलेला ‘शिव’ आणि प्रत्युषा बॅनर्जी सकारात असलेली ‘आनंदी’ ही दोन पात्रे विवाहाच्या भव्य पोशाखांमध्ये, लग्नाच्या अनेक विधींमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. दोन्ही पात्रे एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहताना आणि काही रोमँटिक होताना दिसतात.

पाहा व्हिडीओ :

या मलिकेत आनंदी शिव याला ‘कलेक्टर साहेब’ म्हणून आवाज द्यायची. 2008च्या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला एका ‘कलेक्टर’ची भूमिका साकारायचा, जो पुढे ‘आनंदी’ नावाच्या एका घटस्फोटीत व्यक्तिरेखेशी लग्न करतो. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर ‘बालिका वधू’ मालिकेतील तीन लोकप्रिय पात्रं जगात उरली नाहीत. सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जी व्यतिरिक्त या मालिकेत ‘दादी सा’​​ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे देखील वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. त्या कित्येक महिने आजारी होत्या आणि 2020मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक देखील आला होता.

मालिकेचा हा भाग का झाला ट्रेंड?

सिद्धार्थच्या निधनानंतर चाहते त्याच्याबद्दल अनेक माहिती गुगलवर सर्च करत आहेत. काही वेळापूर्वीचा गुगल ट्रेंड हे स्पष्ट करतो की, लोक दिवंगत अभिनेत्याचे लग्न आणि कुटुंब याबद्दल माहिती शोधत आहेत. शोधल्या जाणाऱ्या काही लोकप्रिय विषयांमध्ये त्याचे कुटुंब, लग्न, लग्नाची तारीख आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. दरम्यान लग्न आणि पत्नी या शोधांमुळे सध्या ‘बालिका वधू’ मालिकेतील लग्नाचा एपिसोड सध्या खूप ट्रेंड होत आहे.

इतकेच नाही तर यावेळी ‘बिग बॉस’ स्पर्धक अभिनेत्री शहनाज गिल हिला देखील खूप सर्च केले गेले. कारण शहनाज आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती.

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया  आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

संबंधित बातम्या :

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन

आलिशान गाडी, मुंबईत फ्लॅट, कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक होता सिद्धार्थ शुक्ला, जाणून घ्या एकूण मालमत्ता

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI