AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झी महागौरव सोहळ्यात Mukta Barve ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारावर मोहोर, ‘या’ सिनेमातील कामाचा झी मराठीकडून गौरव

यंदाच्या महागौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान अभिनेत्री मुक्ता बर्वेने पटकावला. जोगवा या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरच्या हस्ते मिळाला.

झी महागौरव सोहळ्यात Mukta Barve ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारावर मोहोर, 'या' सिनेमातील कामाचा झी मराठीकडून गौरव
मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 7:19 PM
Share

मुंबई : मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी (Zee Marathi)  गेली 21 वर्ष कटिबद्ध आहे. मराठी नाटक चित्रपटांसाठीच ‘झी मराठी’चं हे समृद्ध नातं सन 2000 पासून सुरु झालं होतं. या समृद्ध नात्याचा गौरव करण्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी दिमाखदारपणे संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या महागौरव सोहळ्यात (Mahagaurav Sohala) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान पटकावला अभिनेत्री मुक्ता बर्वेने(Mukta Barve).जोगवा या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या हस्ते मिळाला.

पुरस्कार मिळाल्यानंतर मुक्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “झी महागौरवचा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप छान वाटलं. तो दिवसच खूप छान होता. मला ती संकल्पनाच खूप आवडली. झी गौरवच एकविसावं वर्ष. माझ्या करियरला आता 20 वर्ष झालं. तसेच करिष्मा कपूरच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा पण आनंद आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर मी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यावर फॅन्सनी खूप कौतुक केलं. काहींनी कौतुक करताना ‘निर्विवाद होतं’ अशी कमेंट देखील केली. पण मला स्वतःला निर्विवाद वाटत नाही. कारण अनेक अभिनेत्रींनी उत्तम कामं केली. 21 वर्षात ज्या अभिनेत्रींना पुरस्कार मिळाले त्या उत्तमच आहेत. त्यामुळे माझी पुरस्कारासाठी निवड होणं निर्विवाद होतं असं मी म्हणणार नाही पण माझी निवड झाली याचा मला प्रचंड आनंद आहे.”

यंदाच्या महागौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान अभिनेत्री मुक्ता बर्वेने पटकावला. जोगवा या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरच्या हस्ते मिळाला.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

मुक्ताचं करिअर

मुक्ता मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतीच तिची ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका सोनी मराठीवर येऊन गेली. याशिवाय तिचा ‘पुणे-मुंबई-पुणे’ हा सिनेमाही खूप लोकप्रिय झाला.

संबंधित बातम्या

The Kashmir Files चे दिग्दर्शक Vivek Agnihotri यांच्यावर Me Too चे आरोप, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

Runway 34 trailer: सत्य घटनेवर आधारित अमिताभ बच्चन, अजय देवगण यांचा ‘Runway 34’; पहा उत्कंठावर्धक ट्रेलर

Runway 34 Trailer : रनवे 34 सिनेमाचा ट्रेलर लाँच, कार्यक्रमाला अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंहचा खास लुक

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.