Vijay Divorce Rumours: ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीमुळे मोडणार विजय याचा 27 वर्षांचा संसार, बायकोचे गंभीर आरोप

Thalapathy Vijay Divorce Rumours: अभिनेता थलपती विजय याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. अभिनेत्याचा 'जन नायगन' सिनेमा जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता, अद्यापही सिनेमा अडकलेला आहे. असं असताना आता अभिनेत्या खासगी आयुष्यात मोठं संकट आलं आहे. विजय याच्या बायकोने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Vijay Divorce Rumours: या लोकप्रिय अभिनेत्रीमुळे मोडणार विजय  याचा 27 वर्षांचा संसार, बायकोचे गंभीर आरोप
Thalapathy Vijay
| Updated on: Feb 28, 2026 | 9:30 AM

Thalapathy Vijay Divorce Rumours: साउथ सुपरस्टार थलपती विजय याच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे ‘जन नायगन’ सिनेमा प्रदर्शित होत नाहीये, तर दुसरीकडे अभिनेत्याच्या बायकोने अभिनेत्याने गंभीर आरोप केले आहे. ज्यामुळे घरातील प्रकणर आता कोर्टात पोहोचलं आहे. विजय याची पत्नी संगिता हिने अभिनेत्याचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोप केले आहे. त्यामुळे विजय आणि संगिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल, तर विजय याची पत्नी संगिता हिने कोणत्या अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही. पण घटस्फोटाच्या चर्चा समोर येताच एका अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे आणि तिच्यासोबत विजय याचे अनेक फोटो देखील व्हायरल होत आहेत.

सांगायचं झालं तर,1999 मध्ये विजय आणि संगिता यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाच्या नोंदणी UK येथे करण्यात आली. कारण, अभिनेत्याच्या पत्नीचं नागरिकत्व तेथील आहे. दोघांना एक मुलगा आणि मुलगी देखील आहे. रिपोर्टनुसार, 2021 पासून विजय याने लोकप्रिय अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार, संगिता हिने चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. जाणून घ्या संगिता हिने नवऱ्यावर कोणते आरोप लावले आहेत.

 

 

थलापती विजयच्या बायकोने कोणते आरोप केले?

थलापती विजयच्या बायकोने अनेक आरोप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगिता हिचं म्हणणं आहे की, विजय याने बायकोला वचन दिलं होतं की, अभिनेत्रीसोबत असलेले संबंध लवकरच संपवेल… पण असं काहीही झालं नाही. अभिनेत्याचं अभिनेत्रीसोबत अफेअर सुरुच होतं. विजय यांचं अभिनेत्रीसोबत असलेल्या संबंधांमुळे मानसिक आणि भावनिक त्रास बायको आणि मुलांना सहन करावा लागतोय. पण तक्रारीत संगिता हिने कोणत्याच अभिनेत्री नाव घेतलेलं नाही.

 

 

विजय याच्या बायकोच्या म्हणण्यानुसार, अनेकदा घरातच प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अभिनेत्यावर कोणताच परिणाम झाला नाही. हे प्रकरण वादग्रस्त बनू नये म्हणून तिने विजयसोबत शांतपणे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा काही शक्य झालं नाही तेव्हा तिने स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या कमाईतून कायमस्वरूपी पोटगी आणि सासरच्या घरात राहण्याचा अधिकार मागितला असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

लोकांना अभिनेत्रीला केलं ट्रोल..

विजय याच्यासोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडलं जात आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री त्रिशा कृष्णन आहे. कृष्णन आणि विजय याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर असा दावा करण्यात येत आहे की, दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं आहे. अशात सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचे देखील फोटो असून शकतात. पण याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us