AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा, चार वर्ष चित्रपटांमध्ये मिळाले नाही काम, पैशांची चणचण, एकवेळ जेवण्यासाठी…

नुकताच एका अभिनेत्याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. इतकेच नाही तर संघर्षाच्या दिवसांबद्दल अभिनेता बोलताना दिसलाय. अनेकदा काही कलाकार हे एखाद्या चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका करतात आणि काही दिवसांमध्येच ते पडद्याच्या मागे कुठेतरी गायब होताना दिसतात.

अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा, चार वर्ष चित्रपटांमध्ये मिळाले नाही काम, पैशांची चणचण, एकवेळ जेवण्यासाठी...
| Updated on: Nov 16, 2023 | 8:58 PM
Share

मुंबई : रोनित रॉय यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये गाजवलाय. रोनित रॉय याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे केले. रोनित रॉय थेट म्हणाले, माझा पहिला चित्रपट जान तेरे नाम 1992 मध्ये रिलीज झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट हिट ठरला. मात्र, त्या चित्रपटानंतर मला सहा महिन्यात एकही काॅल आला नाही. त्यानंतर मला खराब काम मिळाले. हातामध्ये काहीच नसल्याने मी काम केले. तीन वर्षे माझ्याकडे काम होते. मात्र, त्यानंतर माझ्या आयुष्यात अत्यंत खतरनाक वेळ आली. मला अजिबातच काम मिळत नव्हते. माझ्याकडे अजिबात पैसे राहिले नाही.

पुढे रोनित रॉय म्हणाले, त्यावेळी माझ्याकडे एक छोटी गाडी होती. मात्र, माझी अवस्था अशी झाली की, साधे त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याइतके देखील माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत. पेट्रोलच काय तर माझ्याकडे एकवेळ जेवणासाठी देखील पैसे नव्हते. मला काय करावे हेच मुळात सुचत नव्हते आणि माझ्यासोबत काय घडतंय हे देखील कळण्यास मार्ग नव्हता.

एक टाईमचे जेवायला देखील पैसे नसल्याने मी जेवण्यासाठी माझ्या आईच्या घरी जात असत. कारण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. पण मी स्वत: मारले नाही. मुळात म्हणजे जवळपास सर्वांनाच या परिस्थितीमधून आयुष्यात जावे लागते. मी त्यामधून बऱ्याच गोष्टी नक्कीच शिकल्या. मात्र, मी कधीच आयुष्यात हार मानली नाही. माझ्यासाठी तो काळ मोठा होता.

मुळात म्हणजे रोनित रॉय यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आज रोनित रॉय हे एक अत्यंत मोठे नाव नक्कीच आहे. मात्र, इथंपर्यंत येण्यासाठी रोनित रॉय यांनी खूप मोठा संघर्ष हा नक्कीच केलाय. रोनित रॉय हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. मात्र, एकेकाळी त्यांना एकवेळेच्या जेवण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागलाय.

रोनित रॉय हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रोनित रॉय हे दिसतात. रोनित रॉय यांनी हलचल, जालसाज, पंख, उडान, 2 स्टेट्स, सरकार 3, लाईगर, राम लखन, तहकीकात, लक्ष्य या चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे फक्त चित्रपट नाही तर मालिकांमध्येही यांनी धमाल ही नक्कीच केलीये.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच