‘मिस्टर इंडिया’ मध्ये श्रीदेवीसोबत सीन शूट करण्यासाठी ‘झुरळाला’ चक्क दारू पाजली होती? काय आहे किस्सा?
'मिस्टर इंडिया' मधील असे प्रसेच सीन आहेत जे प्रेक्षकांना खळखळून हसवतात त्यातीलच एक सीन म्हणजे झुरळाचा सीन. जो श्रीदेवी यांच्यासोबत शूट करण्यात आला होता. पण हे जाणून आश्चर्य वाटेल की या सीनच्या शूटवेळी चक्क त्या झुरळाला दारू पाजण्यात आली होती. नक्की हा काय किस्सा आहे जाणून घेऊयात.

मिस्टर इंडिया हा 1987 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं आणि आजही या चित्रपटातील डायलॉग ते गाण्यांपर्यंत सगळं काही लोकांच्या लक्षात आहे. दरम्यान या चित्रपटाच्या शुटींगवेळी घडलेले अनेक प्रसंगांबद्दल आजही बोललं जातं. त्यातीलच एक किस्सा म्हणजे झुरळाचा.
श्रीदेवीसोबत एका झुरळाचा सीन
हे जाणून धक्का बसेल की या चित्रपटात श्रीदेवीसोबत एका झुरळाचा सीन आहे. त्या सीनसाठी झुरळाला दारू पाजण्यात आली होती. याबद्दलचा किस्सा चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.
‘मिस्टर इंडिया’मध्ये असे अनेक सीन आहेत जे प्रेक्षकांना खळखळून हसवतात. चित्रपटात एक आयकॉनिक सीन आहे जिथे श्रीदेवीला झुरळ दिसतं आणि ती ओरडू लागते. तथापि, या सीनमागील किस्सा आश्चर्यचकित करेल. या सीनच्या शूटिंग दरम्यान झुरळाला दारू पाजण्यात आली होती.
श्रीदेवीसोबतच्या सीनदरम्यान झुरळ दारूच्या नशेत होता.
श्रीदेवीसोबत झुरळाचा हा सीन शूट करायचा होता. शेखर आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी श्रीदेवी आणि झुरळामधील सीन कसा चित्रित करायचा याबद्दल गोंधळात होते. मग त्यांना झुरळाला दारू पाजण्याची कल्पना सुचली. त्यांनी शूट करण्यापूर्वी झुरळावर दारू ओतण्याचा निर्णय घेतला. असे केल्याने झुरळाला खरंच दारूची नशा झाली.
शेखर कपूरने सांगितला तो किस्सा
एका मुलाखतीत दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ब्लॉकबस्टर चित्रपटातील या दृश्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट सांगितली. “बाबा आझमी आणि मी झुरळाला एक्टिव कसे करायचे याचा विचार करत होतो. आम्हाला वाटले, चला ओल्ड माँक रमची बाटली घेऊया. आम्ही झुरळावर थोडी रम ओतली. आम्हाला वाटलं होतं की तो (झुरळ) पिऊन काहीतरी कृती करेल. कदाचित झुरळाला ती ओल्ड माँक खरंच आवडली होती वाटतं.” असं म्हणत त्यांनी त्या सीन शूट मागील मजेदार प्रसंग सांगितला.
जबरदस्त स्टारकास्ट
मिस्टर इंडियामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्यासोबत सतीश कौशिक, अमरीश पुरी आणि अन्नू कपूर सारखे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. निर्मात्यांनी अलीकडेच खुलासा केला आहे की हा सिक्वेल सध्या तयारीच्या टप्प्यात आहे आणि लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
