AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेत पुरले मृतदेह, प्रत्येक सीननुसार वाढतो सस्पेन्स; 6 एपिसोड्सचा क्राइम थ्रिलर पाहून बोबडीच वळेल!

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ही वेब सीरिज सस्पेन्स आणि थ्रिलरचे विषय आवडणाऱ्यांसाठी 'मस्ट वॉच' ठरू शकते. सहा एपिसोड्सची ही सीरिज ट्रेंडमध्ये असून प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळतेय.

बागेत पुरले मृतदेह, प्रत्येक सीननुसार वाढतो सस्पेन्स; 6 एपिसोड्सचा क्राइम थ्रिलर पाहून बोबडीच वळेल!
6 एपिसोड्सचा क्राइम थ्रिलर पाहून बोबडीच वळेल! Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2026 | 11:21 AM
Share

अनेकांना सस्पेन्स-थ्रिलर हा जॉनर प्रचंड आवडतो. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अशा विषयांचे अनेक चित्रपट आणि वेब सीरिज आहेत. अशीच एक सहा एपिसोड्सची ही वेब सीरिज पाहून तुमची बोबडीच वळेल. सध्या ओटीटीवर ही सीरिज ट्रेंड होत असून अनेकांनी त्यांच्या ‘मस्ट वॉच’ यादीत त्याचा समावेश केला आहे. जर तुम्ही सस्पेन्स-थ्रिलरचे चाहते असाल तर ही सीरिज आवर्जून पहा. या वेब सीरिजचं नाव आहे ‘द गार्डनर’. सस्पेन्स, रोमांच, क्राइम आणि थ्रिलर अशा सर्व गोष्टींचा भरणा यात पहायला मिळतो. या सीरिजची कथा एका अशा गार्डनरभोवती फिरते, ज्याच्या बागेत अनेक मृतदेह पुरले आहेत. ही सीरिज जरी दहा महिने जुनी असली तरी ओटीटीवर ती सध्या खूप पाहिली जातेय.

‘द गार्डनर’ ही एक स्पॅनिश रोमँटिक थ्रिलर सीरिज आहे. यामध्ये अल्वारो रिको, कॅटालिना सोपेलाना आणि सेसिलिया सुआरेज यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजची कथा एका अशा गार्डरनभोवती फिरते, ज्याच्यासोबत लहानपणी एक धक्कादायक घटना घडते आणि तो भावनाशून्य होतो. त्याच्या याच स्थितीचा फायदा त्याची आई उचलते आणि त्याला हिटमॅन बनवते. गार्डनरची आई लोकांकडून पैसे घेऊन तिच्या मुलाकडून हत्या करून घेते. यामागचा तिचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे ‘स्वप्नांचा महाल’ ती पुन्हा खरेदी करू शकेल.

गार्डनरसुद्धा त्याच्या आईच्या चुकीच्या उद्देशांचा शिकार होऊन पैशांसाठी लोकांना मारतो आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह आपल्या बागेत पुरतो. जेव्हा हळूहळू त्याला त्याच्या भावना समजू लागतात, तेव्हा गोष्टी बदलू लागतात. गार्डनरला एका मुलीवर प्रेम जडतं आणि तिलाच मारण्याचा आदेश त्याची आई त्याला देते. याच घटनेमुळे त्याच्या आयुष्याला आणि सीरिजच्या कथेला एक वेगळं वळण येतं. यादरम्यान त्याला एक अशी गोष्ट समजते, ज्यामुळे त्याला आणि त्याच्या आईला मोठा धक्काच बसतो.

‘द गार्डनर’ हा स्पॅनिश क्राइम ड्रामा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. या सीरिजमध्ये अल्वारो रिको, सेसिलिया सुआरेज, कॅटालिना सोपेलाना यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 6 एपिसोड्सची ही क्राइम थ्रिलर सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ही सीरिज तुम्ही हिंदी भाषेतही पाहू शकता. आयएमडीबीवर या सीरिजला 6.3 रेटिंग मिळाली आहे.

Follow Us
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?