AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात गाजतेय धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांची कहाणी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ची 2 दिवसांत तगडी कमाई

महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटाने गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं आहे. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या जीवनकथेवर आधारित हा चित्रपट शेतकऱ्यांच्या वास्तववादी संघर्षाचं चित्रण करतो.

महाराष्ट्रात गाजतेय धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांची कहाणी; 'द महाराष्ट्र फाईल्स'ची 2 दिवसांत तगडी कमाई
द महाराष्ट्र फाईल्सImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2026 | 9:35 AM
Share

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूने काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. न्याय आणि योग्य मोबदल्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाने प्रशासन व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या न्यायासाठीच्या लढ्याबाबत व्यापक चर्चा घडवून आणली होती. याच सामाजिक वास्तवाला स्पर्श करणारा आणि व्यवस्थेविरोधातील सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी मांडणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ नुकताच प्रदर्शित झाला. सामाजिक आशय, वास्तववादी कथानक आणि प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने जबरदस्त कमाईदेखील केली आहे.

समाजातील वंचित, दुर्बल आणि न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या घटकांच्या वेदना, भावना आणि वास्तव यांचं प्रभावी चित्रण ‘द महाराष्ट्र फाईल्स’मध्ये करण्यात आलं आहे. शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी सामान्य माणसाला करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे, शेतकरी आणि उपेक्षित समाजाच्या समस्या यांचं वास्तवदर्शी दर्शन या चित्रपटातून घडतं. धर्मा पाटील यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत, समाजातील अनेक न ऐकल्या गेलेल्या आवाजांना आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य माणसांच्या वेदनांना या चित्रपटातून अभिव्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीची कथा न राहता संपूर्ण समाजाच्या भावना आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारा ठरतोय.

दोन दिवसांत जबरदस्त कमाई

‘द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. 12 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दमदार कथा, प्रभावी अभिनय, सामाजिक आशय आणि वास्तवाला भिडणारी मांडणी यांचा उत्कृष्ट संगम असलेला ‘द महाराष्ट्र फाइल्स’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारा आणि विचारप्रवृत्त करणारा चित्रपट ठरत आहे.

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. मोठी स्टारकास्ट आणि अजय-अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाला अधिक उंची मिळाली आहे. ‘सरकार’ आणि ‘विकास’ या संकल्पनांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी किती मर्यादित संबंध असतो, हे चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. शेती आणि शेतकऱ्यांविषयीच्या प्रशासनाच्या उदासीनतेसह रस्ते प्रकल्पांसाठी संपादित होणाऱ्या जमिनींमुळे अनेक कुटुंबांचं आयुष्य कसं विस्कळीत होतं, याचं वास्तववादी चित्रण यात आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा