पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडणार ‘द राजा साब’, अॅडव्हान्स बुकिंगमधून केली इतकी कमाई
प्रभासचा चित्रपट 'द राजा साब'ने अॅडव्हान्स बुकिंगमधून करोडो रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी धुरंधरचा रेकॉर्ड मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपट ‘द राजा साब’ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत. अशातच हा बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठ्या प्रमाणात कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘द राजा साब’ या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून आतापर्यंत 1 लाख 96 हजार पेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत. यामुळे या चित्रपटाने याद्वारे 5.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यासोबतच ब्लॉक सीट्सच्या आकड्यांनुसार 10.11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ज्या पद्धतीने हा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमधून कमाई करत आहे. त्याद्वारे हा चित्रपट पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकतो असं म्हटलं जात आहे.
‘द राजा साब’ पहिल्या दिवशीचे कलेक्शन
प्रभासचा ‘द राजा साब’ हा हॉरर- कॉमेडी चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा चित्रपट तेलुगुसह हिंदी, तमिल, कन्नड आणि मल्याळम या भाषेत देखील पाहता येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट इतर भाषांमध्ये देखील मोठी कमाई करू शकतो. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ‘द राजा साब’ हा चित्रपट तेलुगु भाषेत पहिल्या दिवशी 45 ते 50 कोटींची कमाई करू शकतो. हिंदीमध्ये हा चित्रपट 10 ते 12 कोटींची कमाई करू शकता. तर तमिल, कन्नाड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट 5 ते 6 कोटी रुपयांची कमाई करू शकतो.
मारुती के यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द राजा साब’ हा प्रभासच्या चित्रपटात संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच मालविका मोहनन, रिद्धि कुमार आणि निधि अग्रवाल देखील यामध्ये दिसणार आहेत.
प्रभासच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. ज्यामध्ये संदीप रेड्डी वांगा यांचा चित्रपट स्पिरिट. ज्यामध्ये तृप्ति डिमरीसोबत तो दिसणार आहे. त्यासोबतच कल्कि 2898 एडी 2 मध्ये देखील तो दिसणार आहे.
