AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू, 10 वर्षांपासून होती गायब! घरच्यांनी तोडला होता संबंध; तरुण वयातच…

एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री केवळ 35 वर्षांची होती. गेल्या 10 वर्षांपासून तिने सर्वांशी संबंध तोडले होते. त्यामुळे शेवटच्या कठीण काळातही तिच्यासोबत कोणी नव्हते.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू, 10 वर्षांपासून होती गायब! घरच्यांनी तोडला होता संबंध; तरुण वयातच...
Daveigh ChaseImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2026 | 6:05 PM
Share

मनोरंजन विश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. एका 35 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू झाला आहे. तिने गेल्या काही वर्षांपासून कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले होते. त्यामुळे अभिनेत्रीच्या शेवटच्या आणि कठीण काळात तिच्या सोबत कोणीही नव्हते. आता या अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेकजण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

‘द रिंग’ आणि ‘लिलो अँड स्टिच’ या चित्रपटांमुळे जागभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या डेवे चेसचे निधन झाले आहे. कधीकाळी हॉलिवूडच्या चमकदार जगात चर्चेत असणारी ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या नजरेपासून दूर होती. कुटुंबाशी संबंध तोडले, अभिनय सोडला आणि शेवटी बेघर अवस्थेत जीवन जगत होती.

मृत्यू कशामुळे झाला?

डेवे चेस यांचा मृत्यू जूनमध्ये झाला. त्यावेळी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. आता लॉस एंजिल्स कोरोनर कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण एड्स (AIDS) होते. याशिवाय त्या बॅक्टेरियल मेनिन्जाइटिस, सेप्टिक शॉक आणि शरीरातील गंभीर संक्रमणानेही ग्रस्त होत्या. बऱ्याच काळापासून विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन हे देखील त्यांच्या बिघडत चाललेल्या आरोग्याचे एक प्रमुख कारण मानले जात आहे.

यशस्वी कारकीर्द ते रस्त्यावर येणे

डेवे चेसने अतिशय लहान वयातच अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली होती. ‘द रिंग’ चित्रपटातील भयावह ‘समारा मॉर्गन’ ही भूमिका आणि ‘लिलो अँड स्टिच’ या प्रसिद्ध फ्रेंचायझीमध्ये वॉइस आर्टिस्ट म्हणून तिचे काम आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. ‘डॉनी डार्को’, ‘एस. डार्को’ सारख्या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली होती. मात्र, २०१६ नंतर ती अचानक सर्वांपासून पूर्णपणे लांब झाली. तिने सोशलल मीडियापासून ब्रेक घेतला. तिच्या माजी मॅनेजरच्या मते, एका चित्रपटाच्या मीटिंगला न आल्यानंतर त्यांनी ना मॅनेजरशी संपर्क साधला, ना कुटुंबाशी. पुढील वर्षांमध्ये त्यांचे नाव चोरीच्या गाडीत सापडणे, ड्रग्ज बाळगणे आणि इतर कायदेशीर प्रकरणांमध्येही आले. कुटुंबीयांनी सांगितले की, ती दीर्घकाळ बेघर अवस्थेत राहिली आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंज देत होती. डेवे चेसच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी बाल कलाकार म्हणून चमकणारी ती अभिनेत्री आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात किती कठीण संघर्ष करत होती, हे पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा