‘देख रहा है बिनोद; ‘फुलोरा’ गावाची ‘पंचायत’ पुन्हा भरणार; चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात,मालिकेत नव्या पात्रांची एन्ट्री?

प्राईम व्हिडीओवर प्रसिद्ध असलेल्या "पंचायत" मालिकेच्या चौथ्या सीझनचे चित्रिकरण सुरू झाले आहे. या घोषणेने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सेटवरची मस्ती दाखवणारे फोटो प्राईम व्हिडीओने शेअर केले आहेत. या सीझनमध्ये देखील फुलोरा गावाची पंचायत पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे.

'देख रहा है बिनोद; 'फुलोरा' गावाची 'पंचायत' पुन्हा भरणार; चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात,मालिकेत नव्या पात्रांची एन्ट्री?
Panchayat Season 4
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 2:01 PM

असं म्हणतात प्रतिक्षेचे फळ गोड असतं. प्रेक्षकांचीही प्रतीक्षा आता संपणार आहे. आणि पु्न्हा एकदा त्यांना त्यांच्या आवडत्या गावात जायला मिळणार आहे. तो गाव म्हणजे ‘फुलोरा’. आठवली असेलच सगळी पंचायत. हीच ‘पंचायत’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पण नव्या रुपात.

पुन्हा एकदा भरणार ‘पंचायत’

प्राइम व्हिडीओने एक घोषणा करून चाहत्यांमधील उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. प्राईम व्हिडीओवरील बहुप्रतिक्षित सीरिज ‘पंचायत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . बहुचर्चित आणि लोकप्रिय ‘पंचायत’ सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा झाली असून चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा फुलेरामध्ये पंचायत भरणार आहे.

पंचायतच्या तिनही सीझनने प्रेक्षकांची मने जिंकली. आजही हे तिनही सीझन पाहाताना ते नव्यानेच पाहत असल्याची भावना असते. गावातील सौंदर्य, परस्पर प्रेम आणि भांडणांनी भरलेली ही वेबसिरीज पाहणारे लोक तिची प्रशंसा करताना थकत नाहीत.मुळात म्हणजे या सर्व सीझनमध्ये डायलॉग जबदस्त गाजले. आजही ते लोकांच्या तोंडी आहेत. ‘देख रहा है बिनोद’, ‘ एक नंबर के बनराकस आदमी हैं’ असे कित्येक डायलॉग गाजले आहेत.

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली

तुम्हाला माहितीये भारतासह 240 देशांमध्ये हा सीझन पाहिला गेला आणि तिथल्या जनतेनं तो डोक्यावर घेतला. प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बहुचर्चित कॉमेडी-ड्रामा ‘पंचायत’चा चौथा सीझन कधी येतो याकडे सर्वांचेच डोळे लागले होते.आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून ‘पंचायत’चा चौथा सीझन लवकरत भेटीस येणार आहे . द व्हायरल फीवर‘पंचायत 4’सीरिजची निर्मिती करत आहे. तर दीपिक कुमार मिश्रा आणि अक्षय विजयवर्गीय दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.

Panchayat Season 4

Panchayat Season 4

दरम्यान ‘पंचायत 4’मध्ये अजून कोणते नवे पात्र पाहायला मिळणार का? याची मात्र अजून उकल झालेली नाही. त्यामुळे आता सीरिजचा प्रोमो आल्यानंतर पात्रांबद्दल आणि कथेबद्दल समजेलचं. पंचायतमधील प्रत्येक पात्रासोबत प्रेक्षकांचे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. प्रत्येक पात्राला आपण जवळून ओळखतो अशीच भावना आज प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपेल आवडते कलाकार आणि आपली आवडची सीरिज पुन्हा एकदा नव्याने पाहाता येणार आहे.

Panchayat Season 4

Panchayat Season 4

प्राइम व्हिडीओने सेटवरील अनेक मजेदार फोटो शेअर केले आहेत. पाहा सेटवरजे धम्माल फोटो

Non Stop LIVE Update
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड.
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध.
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'.
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.