AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | सलमान खान आणि सूरज बडजात्या यांची जोडी धमाका करण्यास तयार, ‘या’ महिन्यात सुरू होणार चित्रपटाची शूटिंग

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला होता. मात्र, असे असतानाही सलमान खान याचा हा बहुचर्चित चित्रपट फ्लाॅप गेला.

Salman Khan | सलमान खान आणि सूरज बडजात्या यांची जोडी धमाका करण्यास तयार, 'या' महिन्यात सुरू होणार चित्रपटाची शूटिंग
| Updated on: Jul 08, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता आहे. सलमान खान हा सध्या बिग बाॅस ओटीटी 2 ला होस्ट करत आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटीचे यंदाचे सीजन हिट ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट (Movie) रिलीज झाला होता. विशेष म्हणजे सलमान खान हा किसी का भाई किसी की जान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. मात्र, असे असताना देखील सलमान खान याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाच्या माध्यमातून शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

सलमान खान याचे चाहते त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. फक्त शहनाज गिल हिच नाही तर श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिने देखील किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

नुकताच आता सलमान खान याच्याबद्दल एक अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे. सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात सलमान खान हा धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला सूरज बडजात्या आणि सलमान खान यांच्या जोडीने दिले आहेत. आता परत एकदा हे धमाल करणार आहेत.

विशेष म्हणजे सलमान खान आणि सूरज बडजात्या यांच्या चित्रपटाची शूटिंग ही पुढच्या महिन्यामध्येच सुरू होणार आहे. प्रेम की शादी चित्रपटात सलमान खान हा मुख्य भूमिकेत असणार असून विशेष म्हणजे एका रिपोर्टनुसार या चित्रपटाची शूटिंग ही पुढच्याच महिन्यात सुरू होणार आहे. सलमान खान याच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या स्टारचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचे तर एका मागून एक असे पाच चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. सलमान खान याचा देखील बहुचर्चित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.