The Vampire Diaries फेम अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अपयशी; वयाच्या 45 व्या वर्षी निधन

ॲनीने 29 जानेवारी रोजी सकाळी लॉस एंजिलिसमध्ये अखेरचा श्वास घेतल्याची माहिती तिच्या टीमने दिली. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र ॲनीला कोणता कॅन्सर होता, हे मात्र तिच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.

The Vampire Diaries फेम अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अपयशी; वयाच्या 45 व्या वर्षी निधन
The Vampire Diaries actor Annie WerschingImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 7:13 PM

लॉस एंजिलिस: ’24’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये FBI एजंट रिनी वॉकरची दमदार भूमिका साकारणारी हॉलिवूड अभिनेत्री ॲनी वर्शिंगचं निधन झालं. ती 45 वर्षांची होती. ॲनीने 29 जानेवारी रोजी सकाळी लॉस एंजिलिसमध्ये अखेरचा श्वास घेतल्याची माहिती तिच्या टीमने दिली. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र ॲनीला कोणता कॅन्सर होता, हे मात्र तिच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.

ॲनी वर्शिंगला व्हिडीओ गेम ‘द लास्ट ऑफ अस’मधील टेसच्या भूमिकेला आवाज देण्यासाठीही ओळखलं जातं. व्हिडीओ गेमचे निर्माते नील ड्रकमॅन यांनी अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘आम्ही एका दमदार कलाकाराला आणि सुंदर व्यक्तीला गमावलंय’, अशा शब्दांत त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

‘टाइमलेस’ या साय-फाय सीरिजमध्ये ॲनीसोबत काम केलेली अभिनेत्री ॲबिगेल स्पेन्सरनेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो ॲनी वर्शिंग. तुझी खूप आठवण येईल’, अशी पोस्ट ॲबिगेलने लिहिली.

ॲनी वर्शिंगने तिच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केलंय. यामध्ये ‘स्टार ट्रेक: इंटरप्राइज’, ’24’, ‘बॉश’, ‘द व्हॅम्पायर डायरीज’, ‘रनअवे’, ‘द रुकी’ आणि ‘स्टार ट्रेक: पिकार्ड’ यांचा समावेश आहे. 2020 मध्ये ॲनीला कॅन्सरचं निदान झालं होतं. ॲनीच्या पश्चात पती आणि तीन मुलं असा परिवार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.