Malaika Arora | मलायका अरोराच्या अत्यंत जवळची व्यक्ती रूग्णालयात दाखल, चाहतेही चिंतेमध्ये
मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसकडे अधिक लक्ष कायमच देते. मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा हिने एक फोटोशूट केले होते. हे फोटो तूफान व्हायरल देखील झाले.

मुंबई : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा (Malaika Arora) ही अर्जुन कपूर याच्यासोबत सुट्टया घालवण्यासाठी विदेशात गेली होती. यावेळी अर्जुन कपूर याने मलायका हिच्यासोबतचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. विदेशात धमाल करताना अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा हे दिसले होते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा हे दोघे पार्ट्यांना हजेरी लावताना देखील दिसतात. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्न (Marriage) कधी करणार हा प्रश्न त्यांचे चाहते हे सातत्याने विचारताना देखील दिसतात. मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.
काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा एक सेमी न्यूड फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यानंतर अनेकांनी मलायका अरोरा हिच्यावर टिका केली होती. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी सतत एक चर्चा होती की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई लवकरच मलायका ही होणार आहे. यानंतर अर्जुन कपूर याने संताप व्यक्त केला.
नुकताच मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही हाॅस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिची आई देखील दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून मलायका अरोरा हिचे चाहते चिंतेमध्ये दिसले.

मलायका अरोरा हिचे वडील सध्या हाॅस्पिटलमध्ये आहेत. त्यांना बघण्यासाठीच मलायका अरोरा आणि तिची आई हाॅस्पिटलमध्ये गेली होती. मलायका अरोरा हिच्या वडिलांचे नाव अनिल अरोरा असून त्यांच्यावर सध्या हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मलायका अरोरा हिने काही वर्षांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, 11 वर्षांची मी असतानाच माझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता.
माझ्या आईने माझे आणि माझ्या बहिणीचे संगोपन केले आहे. मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा ही नेहमीच सोशल मीडियावर अर्जुन कपूर याचे फोटो शेअर करताना दिसते. मात्र, अनेकांना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची जोडी आवडत नाही. अर्जुन कपूर आणि मलायका हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.
