Video | नील भट्ट आणि विकी जैन यांच्यामध्ये भांडणे, थेट अंकिता लोखंडे हिच्या पतीला मारण्यासाठी…
बिग बॉस 17 ला सुरू होऊन एक आठवडा देखील झाला नाहीये. मात्र, असे असताना देखील बिग बॉस 17 चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतोय. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा प्रिमियर काही दिवसांपूर्वीच झाला. इतकेच नाही तर बिग बॉस 17 च्या प्रिमियरमध्ये सलमान खान (Salman Khan) हा धमाकेदार डान्स करताना दिसला. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. बिग बॉस (Bigg Boss) 17 बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलंय. बिग बॉस 17 धमाका टीआरपीमध्ये करणार असल्याचे जवळपास नक्कीच आहे. पहिल्याच दिवशी घरातील सदस्य जोरदार भांडताना देखील दिसले.
बिग बॉस 17 मध्ये निर्मात्यांनी देखील कंबर कसल्याचे बघायला मिळतंय. कारण सतत बिग बॉस 17 चे निर्माते हे घरातील सदस्यांसोबत संवाद साधताना दिसत आहे. मनारा चोप्रा हिला कारण नसताना देखील घरातील इतर सदस्य हे टार्गेट करताना दिसत आहेत. बिग बॉस 17 च्या घरात मनारा चोप्रा ही थेट ढसाढसा रडताना देखील दिसली.
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा खूप जास्त सक्रिय दिसतोय. इतकेच नाही तर आपल्याला वेळ देत नसल्याने अंकिता लोखंडे ही थेट विकी जैन याला भांडताना दिसली. अंकिता रडत रडत मला घरी जायचे असल्याचे देखील सांगताना दिसली. विकी जैन आणि अंकिता यांच्यामध्ये खटके उडताना दिसले.
View this post on Instagram
आता नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये घरात मोठे घमासान होताना दिसतंय. इतकेच नाही तर व्हिडीओमध्ये नील भट्ट हा थेट अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन याच्या अंगावर जाताना दिसतोय. यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय.
नील भट्ट याला पकडताना ऐश्वर्या शर्मा आणि घरातील इतर सदस्य हे दिसत आहे. नील भट्ट याच्याबद्दल अत्यंत चुकीचे काहीतरी बोलताना विकी जैन हा दिसतो. ज्यानंतर थेट नील भट्ट हा मारण्यासाठी विकीच्या अंगावर जाताना दिसतोय. मात्र, या प्रोमो व्हिडीओमध्ये हे स्पष्ट होऊ शकले नाहीये की, यांचा वाद हा नेमका कोणत्या कारणामुळे झाला. मात्र, आजचा एपिसोड धमाकेदार होणार हे नक्की
