ऐश्वर्या राय बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यात वाद, थेट वहिणीची तक्रार करताना दिसली अमिताभ बच्चन यांची लेक
ऐश्वर्या राय बच्चन हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या राय बच्चन हिने एक अत्यंत मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय बच्चन हिचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन कायमच चर्चेत असणारे नाव आहे. आज ऐश्वर्या राय बच्चन ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय बच्चन ही मुंबईमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहते. मात्र, ऐश्वर्या राय बच्चन हिचे ननंद श्वेता नंदा बच्चन हिच्यासोबत 36 चा आकडा आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि श्वेता नंदा यांचे नेहमीच खटके उडतात. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन ही श्वेता बच्चन हिला सोशल मीडियावर फाॅलो देखील करत नाही. कधीच आतापर्यंत श्वेता नंदा आणि ऐश्वर्या राय बच्चन या एकत्र दिसल्या नाहीत.
काही दिवसांपूर्वीच श्वेता नंदा ही आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना दिसली. श्वेता नंदा हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. श्वेता नंदा हिने थेट सांगितले की, वहिणी (ऐश्वर्या राय बच्चन) कधीच फोन उचलत नाही, इतकेच नाही तर ती कधीच मेसेजला देखील उत्तर देत नाही. मात्र, श्वेता नंदा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा वाद कशामुळे झाला हे कळू शकले नाहीये.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी श्वेता नंदा हिने कुटुंबियांचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसल्या. तोच फोटो ऐश्वर्या राय बच्चन हिने देखील सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, बाकी कुटुंबियांना त्या फोटोमधून काढून तो फोटो एडिट करत ऐश्वर्या राय बच्चन हिने फक्त मुलगी आराध्या आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो ठेवला.
विशेष म्हणजे इतक्या वर्षांमध्ये कधीच ऐश्वर्या राय बच्चन आणि श्वेता नंदा या एकत्र आल्या नाहीत. अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र राहते. आता लवकरच श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्य नंदा हा बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसणार आहे. अगस्त्य नंदा हा बाॅलिवूडमध्ये काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच श्वेता नंदा ही थेट काैन बनेंगा करोडपती या शोमध्ये पोहचली. यावेळी श्वेता नंदा ही मोठे खुलासे करताना दिसली. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तिने काही खुलासे केले. श्वेता नंदा ही बाॅलिवूडपासून दूर आहे, मात्र, श्वेता नंदा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नेहमीच खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना श्वेता नंदा ही दिसते.
