नवऱ्याचे 2 घटस्फोट झाले म्हणून काय, मी तरी कुठे…, मराठमोळ्या अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
Actress Love Life: 2 मुलींचा बाप आणि 2 वेळा घटस्फोट झालेल्या श्रीमंत उद्योजकासोबत मराठमोळ्या अभिनेत्रीने थाटला संसार, म्हणाली, 'नवऱ्याचे 2 घटस्फोट झाले म्हणून काय, मी तरी कुठे...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Actress Love Life: अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत आलं आहे. अभिनेत्री 2 मुलांचा बाप आणि 2 वेळा लग्न झालेल्या उद्योजकासोबत लग्न केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे आहे. नेहा कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असते. अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याबद्दल आणि त्याच्या दोन पत्नींबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
नेहा पेंडसे हिने उद्योजक शार्दुल व्यास याच्यासोबत लग्न केलं आहे. नेहा ही शर्दुल याची तिसरी पत्नी आहे. शर्दुल याला पूर्व पत्नींकडून दोन मुली देखील आहेत. नेहा आणि शर्दुल यांनी 2020 मध्ये लग्न केलं. ज्यामुळे नेहावर अनेकांनी टीका देखील केली. यावर नेहाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देखील दिलं.
View this post on Instagram
एका मुलाखततीत नेहा म्हणाली होती, ‘शर्दुल याचं दोनवेळा घटस्फोट झालं आहे म्हणून लोकं का चर्चा करत आहेत? त्याचे दोन घटस्फोट झाले आहे तर, मी तरी कुठे कुवारी आहे. शर्दुलने त्या महिलांसोबत संसार तरी थाटला, ज्यांच्यावर तो प्रेम करत होता. मझ्या आयुष्यातून तर सगळे गायब झाले.’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘शर्दुलने माझ्यापासून काहीही लपवून ठेवलं नाही. मला या सर्व गोष्टींबद्दल लग्नाआधी माहिती होतं. मला काहीही फरक पडत नाही आणि येथे आयुष्य संपत नाही… माझं देखील तीनवेळा ब्रेकअप झालं आहे. मी देखील कुवारी नाही.’
‘माझ्या आयुष्यात असं झालं आहे की, लग्नपर्यंत बोलणी झाल्यानंतर मुलांनी माघार घेतली आहे. आयुष्यभराची साथ फक्त सिनेमांमध्ये असते. खऱ्या आयुष्यात असं काहीही नसतं… इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा एका व्यक्तीवर प्रचंड प्रेम करत होती. त्याच्यासोबत माझं लग्न देखील होणार होतं.’
View this post on Instagram
‘पण आमचं लग्न होऊ शकलं नाही. तेव्हा पासून माझा रिलेशनशिपवरून विश्वास नाहीसा झाला.’ नेहाने सांगितलं की, त्या रिलेशनशिपमध्ये अभिनेत्रीने अनेक वेदना सहन केल्या. नेहा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
