AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 FLOP देणाऱ्या अभिनेत्रीची शाहरुख-सलमानला धोबीपछाड ! 5 कोटींच्या चित्रपटाने कमावले 30 कोटी आणि…

Bollywood Quiz : दरवर्षी, अनेक मोठे बॉक्स ऑफिस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतात. काही फ्लॉप होतात, तर काहींकडून कमी अपेक्षा असूनही चांगला गल्ला जमवतात. 23 वर्षांपूर्वी असेच काहीसे घडलं होतं. 24 फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीसमोर सलमान-शाहरुखचं काहीच चाललं नाही. एवढंच नव्हे तर तिने सनी देओललाही धोबीपछाड दिली. असा कोणता होता तो चित्रपट, आणि ती अभिनेत्री तरी कोण ?

24 FLOP देणाऱ्या अभिनेत्रीची शाहरुख-सलमानला धोबीपछाड ! 5 कोटींच्या चित्रपटाने कमावले 30 कोटी आणि...
24 फ्लॉप देणाऱ्या अभिनेत्रीची शाहरूख-सलमानला धोबीपछाड Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Nov 10, 2025 | 2:23 PM
Share

Bollywood Film : दरवर्षी अनेक सुपरस्टारचे चित्रपट प्रदर्शित होतात, परंतु ते सगळेच हिट ठरतात, सगळ्यांची चांगली कमाई होतेच असं नाही. 23 वर्षांपूर्वी जेव्हा सलमान खानचा मोठा चित्रपट रिलीज झाला तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच दरम्यान, शाहरुख खानचा एक चित्रपट चांगला चालला. पण सनी देओलने साकारलेल्या सैनिकाच्या भूमिकेला,त्या चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही. असंच काहीस झालं जेव्हा एका अभिनेत्रीने अनेक प्रमुख कलाकारांना मागे टाकत तगडी कमाई केली. 24 फ्लॉप चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीचा चित्रपट अवघ्या 5 कोटींच्या बजेटमध्ये बनला पण रिलीज झाल्यावर त्याने बक्कळ कमाई केली.कोणता होता तो चित्रपट, आणि ती अभिनेत्री तरी कोण ? चला जाणून घेऊया.

ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय तो एक सुपर नॅचरल चित्रपट होता. प्रदर्शित झाल्यानंतर तो सर्वोत्कृष्ट हिंदी भयपटांपैकी एक बनला. प्रत्यक्षात हा चित्रपट ‘ What Lies Beneath’ या अमेरिकन चित्रपटाचे अनधिकृत रूपांतर होते. पण तो मूळ चित्कपटापेक्षाही उत्तम असल्याचे मत अनेकांचे होते. आदित्य आणि संजनाच्या या चित्रपटाच्या कथेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण कोणालाही माहिती नव्हते की हा चित्रपट 2002 सालचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट बनेल आणि शाहरुख खान, सलमान खान आणि सनी देओल यांनाही मागे टाकेल याची कोणीच कल्पना केली नव्हती.

या अभिनेत्रीपुढे ढेर झाले शाहरूख- सलमान !

शाहरुख खानचा देवदास हा 2002 मधील सर्वात मोठा चित्रपट होता. पण ज्या चित्रपटाने सर्वात जास्त लक्ष आणि प्रशंसा मिळवली तो म्हणजे RAAZ. या चित्रपटात दिनो मोरिया आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हाँ चित्रपट त्यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा पिक्चर ठरला. अवघ्या 5 कोटींत बनलेल्या या चित्रपटाने तेव्हा 37.59 कोटींचा बिझनेस केला. एवढंच नव्हे तर हा चित्रपट दिनो मोरियाच्या करिअरमधला एकुलता एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. फिल्मफेअर पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालेला हा पहिला मेनस्ट्रीम बॉलीवूड हॉरर चित्रपट होता. या चित्रपटाने स्टार स्क्रीन पुरस्कार, 48 वे फिल्मफेअर पुरस्कार, झी सिने पुरस्कार आणि आयफा पुरस्कारांसह विविध कॅटेगरीमध्ये 10 पुरस्कार जिंकले.

त्याच वर्षी शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांचा “हम तुम्हारे हैं सनम” हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यशस्वी ठरला. सलमान खाननेही या चित्रपटात भूमिका केली होती, दोन्ही खान या पिक्चरमध्ये एकत्र दिसले. तर सलमान खानचा “तुमको ना भूल पायेंगे” हा चित्रपटही प्रदर्शित झाला, जो प्रचंड फ्लॉप ठरला. सनी देओलचाही या वर्षी एक चित्रपट प्रदर्शित झाला, पण त्याची जादू चालली नाही. त्याचा “माँ तुझे सलाम” हा पिक्चर खूपच कमी चालला. त्यामुळे बिपाशा बसूसमोर सगळेच अपयशी ठरले.

2001 साली आलेल्या “अजनबी” या चित्रपटातून बिपाशाने कारकिर्दीची सुरुवात केली. तिने “राज”, “जिस्म”, “नो एंट्री”, “धूम 2” आणि “ओमकारा” सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. पणतिने करिअरमध्ये 24 फ्लॉप चित्रपटही दिले.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.