Bigg Boss : वाइल्ड कार्डने बदलला पूर्णच गेम, सर्वांना ठेंगा दाखवून या स्पर्धकाने उचलली ट्रॉफी; कोण आहे तो?
Bigg Boss : 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये जेव्हा जेव्हा वाइल्ड कार्ड एण्ट्री होते, तेव्हा त्याचा गेम पूर्णपणे बदलतो. अशाच एका स्पर्धकाने वाइल्ड कार्ड एण्ट्री घेऊन थेट ट्रॉफी आपल्या नावे केली होती.

‘बिग बॉस’चा प्रत्येक सिझन त्यातील हाय व्होल्टेज ड्रामा, भांडणं, मैत्री आणि प्रेमासाठी ओळखला जातो. या शोची मजेशीर बाब म्हणजे, यामध्ये सुरुवातीपासून सहभागी होणारे स्पर्धकच नाही तर वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणारेही प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या बिग बॉसचा एकोणिसावा सिझन टेलिव्हिजनवर गाजतोय. आतापर्यंत या सिझनमध्ये फक्त एकच वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शाहबाज बादेशा याने घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली. शाहबाजची खेळीही प्रेक्षकांना आवडू लागली आहे. परंतु, तुम्हाला बिग बॉसच्या एका अशा स्पर्धकाविषयी माहीत आहे का, ज्याने शोमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती आणि शेवटी विजेतेपद जिंकून ट्रॉफी घरी घेऊन गेला.
बिग बॉस या शोची जादू तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु जेव्हा वाइल्ड कार्ड एण्ट्री होते, तेव्हा शोमधील ट्विस्ट अधिक रंजक होतात. देवोलीन भट्टाचार्जी, राखी सावंत, विकास गुप्ता, राहुल महाजन, सपना चौधरी यांसारख्या अनेक स्पर्धकांनी आजवर वेगवेगळ्या सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. परंतु बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाने संपूर्ण शोवर आपला ताबाव मिळवला होता. या स्पर्धकाचं नाव आहे एल्विश यादव.
View this post on Instagram
एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी 2’चं विजेतेपद जिंकलं होतं. सोशल मीडियावर आधीच लोकप्रिय असलेल्या या स्पर्धकाने फक्त बिग बॉसच्या प्रेक्षकांचीच मनं जिंकली नाहीत, तर हेसुद्धा सिद्ध केलं की उशिरा येणारासुद्धा सर्वांच्या पुढे जाऊ शकतो. ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो 14 जून 2023 रोजी जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला होता. हा या शोचा डिजिटल व्हर्जन होता. या सिझनचं सूत्रसंचालन सलमान खानने नव्हे तर सुनील ग्रोवरने केलं होतं. ‘बिग बॉस : लाइफ विद अ ट्विस्ट’ असा या सिझनचा थीम होता. या सिझनच्या प्रत्येक टास्कमध्ये प्रेक्षकांना ट्विस्ट आणि टर्न्स पहायला मिळाले होते.
हा शो सुरुवातीला फक्त सहा आठवड्यांचा होता. परंतु प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून निर्मात्यांनी त्याचे आणखी दोन आठवडे वाढवले होते. त्यानंतर ग्रँड फिनालेमध्ये एल्विश यादवने ट्रॉफी आणि 25 लाख रुपये जिंकत सर्वांनाच चकीत केलं होतं. ग्रँड फिनालेमध्ये अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये चुरस रंगली होती.
