AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज कपूर यांच्यामुळे या अभिनेत्रीचे संपले करिअर, दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट, आज तिच्या दोन्ही मुली आहेत सुपरस्टार

राजेश, जितेंद्र आणि शशि यांच्यासोबत हिट चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्रीचे राज कपूर यांच्यामुळे संपलं करिअर. आजही त्यांच्या मुली आहेत सुपरस्टार.

राज कपूर यांच्यामुळे या अभिनेत्रीचे संपले करिअर, दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट,  आज तिच्या दोन्ही मुली आहेत सुपरस्टार
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 20, 2026 | 4:12 PM
Share

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी बबीता यांचे नाव विशेष चर्चेच आहे. मर्यादित कालावधीच्या कारकिर्दीतही त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. रोमँटिक, कौटुंबिक आणि विनोदी अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांमध्ये त्यांनी आपली अभिनयकला सिद्ध केली.

बबीता यांचा जन्म 20 एप्रिल 1947 रोजी कराची येथे झाला. त्यांचे वडील हरि शिवदासानी हे चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने बबीता यांना लहानपणापासूनच अभिनयाचे वातावरण मिळाले. त्यांनी अगदी कमी वयातच चित्रपटात पदार्पण केले. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस लाख’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटातील ‘रीता’ या साध्या पण भावनिक भूमिकेमुळे त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

ओळख आणि यशाची सुरुवात

राज या चित्रपटातून त्यांना मोठी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजेश खन्ना होते. चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. तरी बबीता यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने गती मिळाली ती ‘फर्ज’ या सुपरहिट चित्रपटामुळे. या चित्रपटातील त्यांच्या रोमँटिक भूमिकेमुळे त्या स्टार बनल्या. त्यानंतर हसीना मान जाएगीमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारत आपली कॉमिक टाइमिंगही सिद्ध केली तर किस्मतमध्ये अधिक गंभीर भूमिका निभावली.

1969 मध्ये आलेल्या एक श्रीमान एक श्रीमती या चित्रपटात त्यांनी आधुनिक आणि आत्मविश्वासी तरुणीची भूमिका साकारली. जी त्या काळात नवी आणि वेगळी मानली गेली. याशिवाय तुमसे अच्छा कौन है आणि अनजाना सारख्या चित्रपटांत त्यांनी कौटुंबिक आणि रोमँटिक भूमिका प्रभावीपणे साकारल्या.

कुटुंबाला दिले प्राधान्य

लग्नानंतर बबीता यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. कपूर कुटुंबातील परंपरेनुसार त्यांनी अभिनय सोडून कुटुंबाला प्राधान्य दिले. त्यांचे सासरे राज कपूर यांचा नियम होता की कुटुंबातील महिलांनी चित्रपटात काम करू नये. दरम्यान, रणधीर कपूर यांची कारकीर्द अपेक्षित यश मिळवू शकली नाही, त्यामुळे काही आर्थिक अडचणीही आल्या.

या काळात बबीता यांनी आपल्या मुलींच्या संगोपनावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान या दोघीही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा