AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जियो हॉटस्टारवर रणवीरच्या ‘धुरंधर 2’ला टक्कर देतोय 10 महिने जुना चित्रपट; टॉप ट्रेंडिंगमध्ये कायम

जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच 'धुरंधर 2' स्ट्रीम होत आहे. मात्र दहा महिन्यांपूर्वी ओटीटीवर आलेला एक चित्रपट रणवीरच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाला टक्कर देतोय. हा चित्रपट कोणता आहे, ते जाणून घ्या..

जियो हॉटस्टारवर रणवीरच्या 'धुरंधर 2'ला टक्कर देतोय 10 महिने जुना चित्रपट; टॉप ट्रेंडिंगमध्ये कायम
जियो हॉटस्टारवर ट्रेंड होत आहेत चित्रपटImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2026 | 10:05 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर जूनच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट जियो हॉटस्टारवर दाखल झाला. बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केल्यानंतर रणवीर सिंहचा हा चित्रपट सध्या ओटीटीवरही पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. मात्र ‘धुरंधर 2’ची एवढी क्रेझ असतानाही जियो हॉटस्टारवर एक असा जुना चित्रपट टॉप ट्रेंडिंगमध्ये टिकून आहे, जो इतर सर्व चित्रपटांना टक्कर देतोय. हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. दमदार कथानक आणि कलाकार यांच्या जोरावर या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला होता. आता जियो हॉटस्टारवर ‘धुरंधर 2’लाही तो टक्कर देत आहे.

कोर्टरुम ड्रामा

जियो हॉटस्टारवर तुफान ट्रेंड होणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे ‘जॉली एलएलबी 2’. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट नेटफ्लिक्सशिवाय जियो हॉटस्टारवरही ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत हा कोर्टरुम ड्रामा ओटीटीवर आपलं वर्चस्व टिकवून आहे. हा चित्रपट सतत टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान कायम ठेवून आहे. सध्या ‘जॉली एलएलबी 3’ हा जियो हॉटस्टारवर सातव्या क्रमाकांवर ट्रेंड होतोय.

‘धुरंधर 2’ आणि जियो हॉटस्टारच्या ट्रेंडिंग नंबर्समध्ये बरंच अंतर आहे. परंतु जियो हॉटस्टारच्या टॉप 10 मस्ट वॉच चित्रपटांवर तुम्ही एक नजर मारली, तर रणवीरच्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’नंतर ‘जॉली एलएलबी 3’ हाच चित्रपट बघण्यालायक वाटू शकतो. या चित्रपटात अक्षय कुमार, सौरभ शुक्ला, अर्शद वारसी, अमृता राव, हुमा कुरेशी, सीमा बिश्वास आणि गजराज यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने भारतात 113 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर जगभरातील कमाईचा आकडा 166 कोटी रुपयांवर पोहोचला होता.

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. धुरंधरचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही चित्रपटांमुळे रणवीरची ब्रँड व्हॅल्यू आणि लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. या चित्रपटात त्याने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन, आर. माधवन यांच्याही भूमिका आहेत.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप