AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण शरीरावर जखमा, मरायचं होतं पण…, अत्याचारी नवऱ्याच्या तवडीतून सुटण्यासाठी टीव्ही अभिनेत्रीचा मोठा निर्णय

नवरा सतत मारायचा, कित्येक दिवस उपाशी असायची अभिनेत्री, प्रेग्नेंट राहिल्यानंतर..., अत्याचारी नवऱ्याच्या तवडीतून सुटण्यासाठी टीव्ही अभिनेत्रीचा मोठा निर्णय... आज अभिनेत्री दुसऱ्या नवऱ्यासोबत जगतेय आनंदी आयुष्य...

संपूर्ण शरीरावर जखमा, मरायचं होतं पण..., अत्याचारी नवऱ्याच्या तवडीतून सुटण्यासाठी टीव्ही अभिनेत्रीचा मोठा निर्णय
| Updated on: Feb 12, 2025 | 2:39 PM
Share

अभिनेत्रीचं जीवन सर्वांना फार आकर्षक वाटतं. महागडे कपडे, आलिशान गाड्या, रॉयल लाईफस्टाईल मागे अभिनेत्री अनेक संकटांचा सामना करत असतात. प्रोफेशनल आयुष्यात अभिनेत्री यशाच्या शिखरावर असल्यातरी, अनेक अभिनेत्री घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरतात. असं काही टीव्ही विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं. ‘नव्या’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सौम्या सेठ हिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. लग्नानंतर अभिनेत्रीवर सासरच्या मंडळींना अत्याचार सुरु केले. मारहाण केल्यामुळे अभिनेत्रीच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या.

सौम्या जेव्हा स्वतःला आरशात पाहायची तेव्हा स्वतःची अवस्थापासून अभिनेत्री पूर्णपणे खचली होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सौम्या सेठ हिने लग्नानंतर अत्याचारी नवऱ्याने केलेल्या गैरवर्तनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

सासरच्या मंडळींकडून अत्याचार होत असताना सौम्या गरोदर राहिली. प्रेग्नेंट असल्यामुळे सौम्याने लग्न टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र कौटुंबिक हिंसाचारामुळे तिचं जगणं कठीण झालं होतं. अनेकवेळा मरण्याचा विचारही अभिनेत्रीच्या मनात यायचा, पण गरोदर असल्यामुळे सौम्या मरण्याचा विचारही करू शकत नव्हती.

View this post on Instagram

A post shared by Somya Seth (@somyaseth)

अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, जखमी अवस्थेत ती कित्येक दिवस उपाशी देखील असायची… सौम्याला तिच्या पोटात असलेल्या बाळाला गमवायचं नव्हत म्हणून अभिनेत्री सर्वकाही सहन करत राहिली. अखेर रात्र झाल्यानंतर जसा दिवस उजाडतो, त्याच प्रमाणे सौम्याच्या आयुष्यात तिच्या मुलाची एन्ट्री झाली आणि अभिनेत्रीच्या आयुष्यात चांगले दिवस आले.

अत्याचारी नवऱ्याच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘मुलगा आयडेनचं माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी फार लकी ठरलं. 2019 मध्ये माझी एका वाईट नात्यातून सुटका झाली. आता मी माझं आयुष्य आनंदाने जगत आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं. ‘नव्या’ फेम सौम्या सेठचं पहिले लग्न अरुण कपूरसोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने डिसेंबर 2024 मध्ये दुसरं लग्न केलं. सौम्याच्या दुसऱ्या पतीसोबत कायम फोटो पोस्ट करत असते.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी