AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल कपूरला धमकी; चंकी पांडेच्या मारली थोबाडीत; रागामुळे या अभिनेत्रीचे करिअरच संपले

बॉलिवूडमधील एक अभिनेत्री तिच्या रागीट स्वभावासाठी ओळखली जात असे. अनिल कपूरला धमकी देण्यापासून ते चंकी पांडेला थप्पड मारण्यापर्यंत, तिच्या वादांनी अनेकदा हेडलाईन्स गाजवल्या. याच स्वभावामुळे तिच्या बॉलिवूड करिअरवर नकारात्मक परिणाम झाला. कोण आहे ही अभिनेत्री?

अनिल कपूरला धमकी; चंकी पांडेच्या मारली थोबाडीत; रागामुळे या अभिनेत्रीचे करिअरच संपले
Farah Naaz Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2025 | 1:45 PM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक घटना घडतात की ज्याच्याबद्दल आजही चर्चा होते. तसेच अनेक कलाकार हे चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतात. तसेच काही कलाकार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत असतात. त्यामुळे अशा कलाकारांचे अनेकदा सेटवर वादही झाले आहेत. तर काहींना या वादामुळे चित्रपटगही गमवावा लागल आहे. अशीच चर्चा एका अभिनेत्रीबाबतही झाल्या आहेत. या अभिनेत्रीच्या रागामुळे तिला चित्रपटही गमवावा लागला आणि करिअरही.

अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण 

या अभिनेत्रीचे अनिल कपूर पासून ते चंकी पांडेपर्यंत सर्वांसोबत वाद झाले आहेत. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री  बॉलीवूड अभिनेत्री तब्बूची बहीण आहे. ती 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ती अभिनेत्री म्हणजे फराह नाज. ती बॉलिवूडमध्ये तिच्या रागीट स्वभावासाठी ओळखली जात असे. तिने एकदा चंकी पांडेला थप्पड मारली आणि अनिल कपूरला धमकी दिली. तिचे वैयक्तिक आयुष्यही खूप अस्थिर होते. घटस्फोट घेतल्यानंतर तिने दुसऱ्या अभिनेत्याशी लग्न केले.

घरच्यांशी वाद झाला की अभिनेत्री तिची हातावर वार करत असे

फराहनचा जन्म 1968 मध्ये हैदराबादमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. अवघ्या 17 व्या वर्षी तिने यश चोप्रा यांच्या 1985 मध्ये आलेल्या ‘फासले’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. नंतर तिने राजेश खन्ना, धर्मेंद्र, ऋषी कपूर, विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये काम केले. ती शबाना आझमी यांची भाची आणि प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू यांची मोठी बहीण आहे.

अभिनेत्रीने इमानदार, मरते दम तक, कौन फिर आएगी, यतिम, बाप नंबरी बेटा दस नंबरी, बेगुनाह, सौतेला भाई, पतनी और तवैफ, खुदा गवाह आणि अमर प्रेम यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आम्ही प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाजबद्दल बोलत आहोत.

View this post on Instagram

A post shared by Farha Naaz (@farha.fateh)

‘माझे कुटुंब मला मरू देणार नाही’

1988 मध्ये एका मुलाखतीत फराहने सांगितले की, तिच्या कुटुंबाशी झालेल्या वादानंतर तिने दोनदा आपली मनगटावर वार करत असे. तिने स्पष्ट केले की, “मी हे स्वतःला मारण्यासाठी केल नाही. कोणीही आपली नस कापून मरत नाही. मला माहित आहे की माझे कुटुंब मला मरू देणार नाही. पण जेव्हा जेव्हा माझी आई किंवा माझी बहीण असे काही बोलत असे जे मला सहन होत नाही, तेव्हा मी ते करायचे.”

कुटुंबाचे लक्ष खेचण्यासाठी ती हे करायची 

फराह पुढे म्हणाली, “माझ्यावर विश्वास ठेवा, मी काय करत आहे किंवा मला ब्लेड कुठून मिळत आहे हे मला माहित नव्हतं, आणि जेव्हा मी माझ्या नसा कापते तेव्हा मला फारसे दुखतही नव्हते. असे केल्याने, मला जे त्रास देत होते त्यापासून मी स्वतःचे लक्ष विचलित करत असे. त्यांचे लक्ष माझ्याकडे खेचण्याचा हा माझा मार्ग होता. जर मी आत्महत्या केली तर त्यांना कळणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा ते माझ्या जखमा अशा प्रकारे पाहतील तेव्हा त्यांना कळेल की त्यांनी मला दुखावले आहे. त्यासाठी मी हे करायचे.” असं म्हणत फराहने तिच्या रागीट स्वभावाबद्दल सांगितले.

रागीट स्वभावामुळे अभिनेत्रीचे करिअरच संपले 

तिच्या याच स्वभावामुळे फराह वादातही अडकली आहे, ज्याचा तिच्या करिअरवर देखील परिणाम झाला. 1989 मध्ये आलेल्या “कसम वर्दी की” या चित्रपटात चंकी पांडेसोबत काम करताना त्याने तिच्यावर विनोद केला होता. तेव्हा ती इतकी रागावली की तिने त्याला थेट कानाखाली लगावली होती.

जेव्हा फराह नाजचा अनिल कपूर अभिनीत “राखवाला” चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला तेव्हा अनिल कपूरने टिप्पणी केली की जर माधुरी नायिका असती तर चित्रपट यशस्वी झाला असता. यामुळे फराह संतप्त झाली आणि तिने अनिल कपूरला थेट धमकी दिली.

दोन लग्न केली 

1996 मध्ये फराहने दारा सिंगचा मुलगा विंदू दारा सिंगशी लग्न केले आणि एका वर्षानंतर तिला फतेह रंधावा नावाचा मुलगा झाला. सहा वर्षांच्या लग्नानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर फराह नाजने अभिनेता सुमीत सहगलशी लग्न केले. सुमीतचे हे दुसरे लग्न होते, कारण त्याचे आधी शाहीन बानोशी लग्न झाले होते, जिच्यापासून त्याला सायेशा ही मुलगी आहे. फराह आणि सुमीतला आता मुले नाहीत.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.