AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान-कतरिनाच्या ‘टायगर 3’ची बंपर ओपनिंग; मोडला सनी देओलच्या ‘गदर 2’चा विक्रम

सलमान खान आणि कतरिना कैफच्या मुख्य भूमिका असलेल्या 'टायगर 3' या चित्रपटाने बंपर ओपनिंग केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाची धमाकेदार कमाई झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सनी देओलच्या 'गदर 2'ला मागे टाकलं आहे.

सलमान-कतरिनाच्या 'टायगर 3'ची बंपर ओपनिंग; मोडला सनी देओलच्या 'गदर 2'चा विक्रम
Tiger 3Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2023 | 1:09 PM
Share

मुंबई : 13 नोव्हेंबर 2023 | सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. लक्ष्मीपूजन असतानाही या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सुरुवातीपासूनच ‘टायगर 3’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे पहिले दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. त्यामुळे तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. म्हणूनच पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे.

सलमान आणि कतरिनाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 44.5 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली. हिंदी भाषेत जवळपास 43 कोटी रुपये आणि तेलुगू भाषेत जवळपास 1.15 कोटी रुपयांची कमाई झाली. तर तमिळ भाषेत या चित्रपटाने 15 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. टायगर 3 या चित्रपटाने पहिल्याच दिवसाच्या कमाईने सनी देओलच्या ‘गदर 2’चा विक्रम मोडला आहे. ‘गदर 2’ने पहिल्या दिवशी 40.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर सलमानच्या ‘टायगर 3’ने पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सलमानचा हा चित्रपट आगामी दिवसांत जवान, पठाण या चित्रपटांचेही विक्रम मोडू शकतो.

मनिष शर्मा दिग्दर्शत ‘टायगर 3’ हा चित्रपट सलमान खानचा सर्वांत मोठा ‘ओपनर’ ठरला आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अली अब्बास जफरच्या ‘भारत’ आणि त्याआधी 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांना ‘टायगर 3’ने मात दिली आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते. ‘भारत’ने 42.30 कोटी रुपये आणि ‘प्रेम रतन धन पायो’ने 40.35 कोटी रुपये कमावले होते. ‘टायगर 3’ या चित्रपटात सलमान आणि कतरिनासोबतच इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. तर शाहरुख यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....