AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वर्ष जुन्या मराठी चित्रपटातील डायलॉग अचानक आलं चर्चेत, देशभरातली लोकं करतायेत सर्च,कारण…

मराठी चित्रपटसृष्टीतील काही डायलॉग असे असतात, जे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनीही प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. 'टाईमपास' चित्रपटातील असाच एक संवाद सध्या गणपती उत्सवाच्या काळात सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला होता. गणपतीच्या आरतीतील एका ओळीवर आधारित मजेशीर रील्स सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

11 वर्ष जुन्या मराठी चित्रपटातील डायलॉग अचानक आलं चर्चेत, देशभरातली लोकं करतायेत सर्च,कारण...
Prathmesh ParabImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 8:37 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील काही डायलॉग असे असतात, जे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनीही प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. ‘टाईमपास’ चित्रपटातील असाच एक संवाद सध्या गणपती उत्सवाच्या काळात सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला होता. गणपतीच्या आरतीतील एका ओळीवर आधारित मजेशीर रील्स सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

‘सरळ सोंड वक्र तुंड त्रीनयना, दास रामाचा वाट पाहे सदना’ या आरतीच्या ओळीचा संदर्भ घेत काही रील्स तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरती बोलताना अनेक जण करत असलेली चुक म्हणजेच ‘वाट पाहे सदना’ ऐवजी ‘वाट पाहे सजना’ असा मजेशीर बदल दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना ‘टाईमपास’मधील संबंधित प्रसंगाची आठवण झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या रील्समध्ये गणपती बाप्पा सजना या शब्दावरील नराजी दाखवत आहेत. म्हणतात, कैसा भाषा है रे तुम लोगों का? तर मूषक सांगत आहे “नया है वह” या रील्समधील कल्पना नेटकऱ्यांना का आवडली, याचे कारण त्यातील साधेपणा आणि चित्रपटाच्या आठवणी असे म्हणता येईल. गणपती आरतीशी संबंधित ओळ परिचित असल्याने हा संदर्भ लगेच लक्षात येतो आणि त्यातून विनोद निर्माण होतो.

या ट्रेंडमुळे ‘टाईमपास’मधील जुन्या संवादाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील संवाद आजच्या सोशल मीडिया ट्रेंडशी जोडला जात असल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by 22 (@marathitherapy)

‘टाईमपास’ हा रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपट 3 जानेवारी 2014 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रथमेश परबने दगडू आणि केतकी माटेगावकरने प्राजक्ता म्हणजेच प्राजूची भूमिका साकारली आहे. वैभव मांगले आणि भाऊ कदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत चिनार-महेश यांनी दिले आहे.

1990 च्या दशकातील किशोरवयीन प्रेमकथेवर आधारित ‘टाईमपास’मधील विनोदी आणि रोमँटिक संवाद तरुणाईमध्ये लोकप्रिय झाले. ‘आई-बाबा आणि साईबाबा शप्पत… अशीच पाहिजे आपल्याला!’ तसेच ‘आपल्याला दोन गोष्टी लई आवडतात, काजू कतली आणि आपली प्राजू पतली!’ हे संवादही आजपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना