खासदार-अभिनेत्री नुसरत जहां प्रेग्नंट? नवऱ्यापासून सहा महिने वेगळी राहत असल्याची चर्चा

नुसरत-निखिल सहा महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत. नुसरत आणि आपल्यात संपर्क नसल्याचा दावा खुद्द निखिलने केल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत (Actress Nusrat Jahan Pregnant )

खासदार-अभिनेत्री नुसरत जहां प्रेग्नंट? नवऱ्यापासून सहा महिने वेगळी राहत असल्याची चर्चा
अभिनेत्री नुसरत जहां

कोलकाता : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. त्यातच ती पती निखिल जैनपासून वेगळी राहत असल्याचाही दावा केला जात आहे. नुसरतच्या गरोदरपणाबाबत ती किंवा तिच्या टीमने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र ‘हिंदुस्तान टाईम्स बंगाल’च्या रिपोर्टनुसार नुसरत 6 महिन्यांची गर्भवती आहे. धक्कादायक म्हणजे पती निखिलला याविषयी काहीच थांगपत्ता नसल्याचंही बोललं जातं. (TMC MP Bengali Actress Nusrat Jahan reportedly Pregnant allegedly separated from Husband Nikhil Jain)

दीड वर्षांतर नात्यात दरी

निखिल आणि नुसरत यांचा विवाह तुटण्याच्या मार्गावर असल्याचं ‘एबीपी आनंदा’ वेबसाईटने म्हटलं आहे. दोघंही सहा महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत. नुसरत आणि आपल्यात संपर्क नसल्याचा दावा खुद्द निखिलने केल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. 19 जून 2019 रोजी नुसरत आणि निखिल विवाहबंधनात अडकले होते. अवघ्या दीड वर्षांतर दोघांच्या नात्यात दरी आल्याचं बोललं जातं. नुसरत आणि निखिल यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, नुसरत आणि भाजप नेते यश दासगुप्ता रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. दोघांनीही या चर्चांवर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण आहे नुसरत जहां?

फिल्मी दुनियेत छाप पाडल्यानंतर नुसरत जहां लोकसभेवर निवडून आली. तृणमूल काँग्रेसने नुसरतला बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. तिने भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्बल साडेतीन लाखांच्या मताधिक्यासह पराभव केला होता.

अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्तीही नुसरत जहांच्या जोडीने खासदारपदी निवडून आली आहे. दोघींनी संसदेबाहेर केलेलं फोटोशूट चांगलंच गाजलं होतं. या दोघीही बंगाली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. (Actress Nusrat Jahan Pregnant )

हिंदू पद्धतीने विवाहानंतर टीका

नुसरत जहांने 19 जून 2019 रोजी तुर्कीतील बोडरम शहरात निखिल जैन या व्यावसायिकाशी हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर नवरात्रीतही तिने पारंपरिक हिंदू पोशाखात पूजा केल्यामुळे तिच्यावर टीका झाली होती. परंतु तिने विरोधकांची तोंडं गप्प केली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

संबंधित बातम्या

TikTok | ‘टिक टॉक’ बंदीवर पहिला आवाज, ममतांची अभिनेत्री खासदार मैदानात

Yami Gautam : लग्नानंतर यामी गौतमचा पहिला फोटो आला समोर, या लूकमध्ये दिसली प्रचंड सुंदर

(TMC MP Bengali Actress Nusrat Jahan reportedly Pregnant allegedly separated from Husband Nikhil Jain)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI