AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’मधील कलाकारांच्या आरोपांवर अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन; म्हणाले “मी त्यांना माफ..”

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला सोडून गेलेल्या काही कलाकारांनी निर्मात्यांवर आणि शोवर विविध आरोप केले होते. या आरोपांवर अखेर निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने त्यांच्यावर गैरवर्तणुकीचेही आरोप केले होते.

'तारक मेहता..'मधील कलाकारांच्या आरोपांवर अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन; म्हणाले मी त्यांना माफ..
'तारक मेहता..'चे निर्मातेImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2025 | 11:25 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. लोकप्रियतेसोबत ‘तारक मेहता..’ ही मालिका काही वादांमुळेही चर्चेत राहिली. यातील काही कलाकारांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मिसेस सोढीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने त्यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. तर तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांनी पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या सर्व आरोपांवर आता निर्मात्यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, “मी कलाकारांपासून कधी दुरावलो नव्हतो. जर एखादी समस्या असेल तर ते नेहमीच मला संपर्क करू शकत होते. मी नेहमीच प्रामाणिकपणे वागलो आणि मालिकेला प्राधान्य दिलं. त्यातून मी कधीच वैयक्तिक फायद्याचा विचार केला नाही. त्यामुळे अशा आरोपांमुळे मी नाराज झालो होतो. परंतु हा आयुष्याचा एक भागच आहे.”

“मालिका सोडून गेल्यानंतर काही कलाकार माझ्याविषयी बरंवाईट बोलत आहेत. ठीक आहे. मी त्यांना काहीच बोलणार नाही. त्यांनी माझ्या मालिकेत काम केलंय आणि ‘तारक मेहता..’च्या यशात त्यांची भूमिका आहे. जरी मी मालिकेचा कर्ताधर्ता असलो तरी प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे ती लोकप्रिय झाली. आज ही मालिका ज्या यशाच्या शिखरावर आहे, ते फक्त माझ्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे नाही तर सर्वांमुळे आहे. आम्ही सर्वजण जणू एखाद्या ट्रेनसारखे आहोत. काही डब्बे रुळावरून घसरतात, परंतु तरीही ट्रेन चालत राहते. मलाही वाईट वाटतं पण मी त्यांना माफ करतो. कारण जर मी माझ्या मनात हेवेदावे घेऊन बसलो तर मी कधीच खुश राहू शकणार नाही आणि कधीच लोकांना हसवू शकणार नाही”, असं ते पुढे म्हणाले.

‘तारक मेहता..’च्या यशाबद्दल असित कुमार मोदी म्हणाले, “जेव्हा एखादी मालिका लोकप्रिय होते, तेव्हा ते संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळ असतं. त्या सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना कोणतीही समस्या होणार नाही याची काळजी मी घेईन. मी त्यांना एकत्रित ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करतो आणि जर ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक राहिले तर इतक्या समस्या निर्माण होणारच नाहीत.”

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.