कंडोमच्या जाहिरातीसाठी तर थेट..; ‘टॉक्सिक’मधल्या सीन्सवरून ट्रोल होताच यशने दिलेलं उत्तर चर्चेत
अभिनेता यश याने नुकताच झालेल्या एका कर्यक्रमात 'टॉक्सिक' सिनेमातील डार्क सीन, ट्रोल्स आणि अश्लीलतेच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने स्पष्ट केलं की, सिनेमा जेन झीच्या भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतिबिंब असल्याचं स्पष्ट केलं.

सुपरस्टार यश आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. 26 ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी किआरा आणि यश यांच्या काही सीन्सना ट्रोल केलं. दरम्यान, ‘आप की अदालत’ शोमध्ये अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे. सुपरस्टारने स्पष्ट केलं की, पडद्यावर दाखवलेल्या घटना या समाजाचेच प्रतिबिंब आहेत. ‘ट्रोल्स’ना चोख प्रत्युत्तर देतानाच अभिनेत्याने असं देखील सांगितले की, हा सिनेमा नवीन पिढीच्या भावना, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करून साकारण्यात आला आहे.
मुलाखती दरम्यान, रजत शर्मा यांनी यश याला विचारलं. ‘एका नेटकऱ्यांना कमेंट केली आहे की, ‘तबाही’ गाणं कंडोमची जाहिरात आहे? यावर अभिनेता म्हणाला, ‘कंडोमचीच जाहिरात करायची असेल तर मी पैसे घेऊन करेल, मोफत तर बिलकूल करणार नाही.. ‘, तर सिनेमातील एका सीनमध्ये असं देखील दाखवण्यात आलं आहेत, एक व्यक्त कबर खोदतो आणि मृतदेहावर असलेली सोन्याची वस्तू घेतो… यावर यश म्हणाला, ‘तो सीन कथेचा एक भाग आहे. सिनेमा पाहिल्यानंतर नेमकं काय आहे तुम्हाला कळेल… हे एका सत्य घटनेवर आधारित आहे. समाजात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे…’
हिंसा आणि अश्लीलता या गोष्टींसाठी ‘जेन झी’ला का जबाबदार धरलं जातं? असं विचारलं असता यश म्हणाला, ‘आपल्या पुढची पिढी नक्कीच आपल्यापेक्षा चांगलं करेल. जी पिढी आणि भुतकाळात जमा आहे, त्यांना असं वाटतं की, नवीन पिढी त्यांच्या मार्ग चूकत आहे. ही आयुष्यभराची समस्या आहे. पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे. जे जग आता तरुणांचं आहे. जेव्हा आपले दिवस आले, तेव्हा आपण केलं. जेव्हा तुमची वेळ येईल, तेव्हा तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीनुसार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार वागाल.
पुढे अभिनेता म्हणाला, अश्लीलता चुकीची आहे. मी तसं काहीही केलेलं नाही; ते तुम्ही सर्वांनी पाहिलंच आहे. तरीही, एक मर्यादा असते आणि त्याची आम्हाला जाणीव आहे. गोष्टींचं चित्रण सौंदर्यपूर्णरीत्या करणं आवश्यक असतं. हा सिनेमा अशा उद्देशाने बनवला गेला आहे ज्यात भावनांना सर्वोच्च महत्त्व आहे. सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला हे समजेल. हा सिनेमा प्रामुख्याने ‘जेन झी’साठी आहे. यात अशा डायलॉगचा समावेश आहे जे तुम्ही प्रत्यक्ष करता आणि यात जुन्या पिढीसोबत तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांवरही भाष्य केलं आहे. त्यामध्ये चुकीचं काय आहे? तुमचे जे विचार आहे, तेच या सिनेमाचा मुख्य पैलू आहे…, असं देखील अभिनेता यश म्हणाला आहे.
