Tandav Trailer Out : सत्ता, राजकारण आणि षडयंत्र, सैफच्या ‘तांडव’चे ट्रेलर लॉन्च!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) वेब मालिका 'तांडव' चे ट्रेलर आज रिलीज झाले आहे.

Tandav Trailer Out : सत्ता, राजकारण आणि षडयंत्र, सैफच्या 'तांडव'चे ट्रेलर लॉन्च!


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) वेब सीरीज ‘तांडव’ (Tandav) चे ट्रेलर आज रिलीज झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते सैफ अली खानची वेब सीरीज तांडवची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यानंतर आता हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या वेब सीरीजमध्ये सैफ अली खानची पूर्णपणे बदललेली स्टाईल दिसत आहे. या सीरीजची स्टोरी राजकारणावर आधारित आहे.  या वेब सीरीजचा पहिला टीझर 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. (Trailer of actor Saif Ali Khan’s web series ‘Tandav’)

जेव्हा या वेब सीरीजची घोषणा झाली तेव्हा सैफने सांगितले की होते की, ही वेब सीरीज भारतीय राजकारणाभोवती फिरणार आहे. ही वेब सीरीज उत्तर प्रदेशातील राजकारण, दलित आणि यूपी पोलिसांमधील संबंध यासारख्या विविध गोष्टी यामध्ये आहेत. सैफ एक राजकारणी म्हणून दिसणार आहे. चंद्रगुप्त मौर्याचे सर्वात बुद्धिमान सल्लागार चाणक्य म्हणून त्यांने आपल्या भूमिकेचे वर्णन केले.

या वेब सीरीजमध्ये डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, गौहर खान, मोहम्मद झीशान, कृतिका कामरा, सुनील ग्रोहर, अनूप जोशी, कुमुद मिश्रा हे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तांडव वेब सीरीज 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

‘तांडव’ अली अब्बास जफर हे दिग्दर्शित करणार आहेत, ज्यांनी ‘भारत’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘गुंडे’ सारख्या अनेक बॉलिवूड हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सैफचे चाहते आता त्याच्या या वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरीज शिवाय सैफ अली खान प्रभास स्टारर फिल्म ‘आदिपुरुष’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात सैफ रावणची भूमिका साकारत आहे.

संबंधित बातम्या :

New Project | बाहुबलीच्या भल्लालदेवची ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री, ‘या’ सीरीजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Mirzapur 2 | रॉबिनच्या तोंडी गाजलेला ‘ये भी ठीक है’ आला कुठून? खुद्द प्रियांशूने सांगितला किस्सा

(Trailer of actor Saif Ali Khan’s web series ‘Tandav’)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI