AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay-Trisha : त्रिशाने विजयच्या मुलांना जन्म…, ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर संतापली अभिनेत्री; म्हणाली…

Vijay-Trisha : सध्या सर्वत्र अभिनेत्री त्रिशा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्यांच्या नात्याला विरोध देखील केला. दरम्यान एका व्हायरल व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

Vijay-Trisha : त्रिशाने विजयच्या मुलांना जन्म..., 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर संतापली अभिनेत्री; म्हणाली...
| Updated on: May 16, 2026 | 1:00 PM
Share

Vijay-Trisha : अभिनेत्री त्रिशा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण सोशल मीडियावर त्रिशा हिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. यावर 62 वर्षीय अभिनेत्रीने त्या महिलेला सडेतोड उत्तर दिलं जिने, त्रिशा आणि विजय यांच्या नात्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री कुनिका म्हणाली, ‘एक महिलाच दुसऱ्या महिलेची सर्वात मोठी शत्रू असते आणि आज पुन्हा ही गोष्ट सिद्ध ढाली आहे…’, सांगायचं झालं तर, जेव्हा विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून दोघांचं नातं निशाण्यावर आहे… शपथ सोहळ्यासाठी थलपती विजय आणि त्यांच्या मुलांनी हजेरी लावली नव्हती. पण त्रिशा त्याठिकाणी होता. अशात गायिका सुचित्रा हिने देखील संताप व्यक्त केला… आता सोशल मीडियावर त्रिशा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एका महिला नेटकऱ्यांने त्रिशा हिच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर कुनिका संतापली आणि तिने सडेतोड उत्तर त्या महिलेला दिलं. मिनी नावाच्या एका X युजरे त्रिशासाठी एका पोस्ट शेअर केली. व्हिडीओमध्ये त्रिशा, विजय यांच्या शपथ सोहळ्या दरम्यान भावूक होताना दिसली. यावर युजर म्हणाली, ‘त्रिशा हिचं अभिनय कौषल्य भन्नाट आहे. विजय जोसेफ यांच्या कठीण काळात तिने स्ट्रगल केल नाही. त्यांच्या मुलांना जन्म दिलं नाही… त्यांच्या मुलांचं पालन – पोषण केलं नाही… आता फक्त त्यांच्या कुटुंबाच्या मेहनतीचा आणि संपत्तीचा आनंद घेण्यासाठी आली आहे…’

यावर संताप व्यक्त करत कुनिका म्हणाली, ‘पुन्हा एक महिला दुसऱ्या महिलेवर निशाणा साधत आहे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. लोकं म्हणतात, एक महिलाच दुसऱ्या महिलेची सर्वात मोठी शत्रू असते आणि ते खरं देखील आहे. जे आज पुन्हा सिद्ध झालं आहे…’, असं देखील कुनिका म्हणाली आहे.

त्रिशा आणि थलपती विजय यांची मैत्री आणि रिलेशनशिपच्या चर्चा…

त्रिशा कृष्णन थलपथी विजय यांची जुनी मैत्रीण असली आणि त्यांनी अनेक हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केलं असलं तरी, एप्रिल 2026 मध्ये अभिनेत्याच्या पत्नीने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या अफवांना जोर चढला.

काही दिवसांनंतर, विजय आणि त्रिशा कृष्णन एका रिसेप्शनसाठी एकत्र पोहोचले. शिवाय निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशा हिने विजय यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.