AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैराट’ फेम अरबाजच्या व्हिडीओनंतर तुकाराम मुंढे रुग्णालयावर कारवाई करणार का? नेटकऱ्यांचा सवाल

'सैराट' फेम अरबाज शेखच्या आरोपांनंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे संबंधित रुग्णालयावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खाजगी रुग्णालयाकडून लूट सुरू असल्याचा आरोप अरबाजने केला होता.

'सैराट' फेम अरबाजच्या व्हिडीओनंतर तुकाराम मुंढे रुग्णालयावर कारवाई करणार का? नेटकऱ्यांचा सवाल
तुकाराम मुंढे, अरबाज शेखImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 09, 2026 | 11:55 AM
Share

‘सैराट’मध्ये सल्याची भूमिका साकारलेला अभिनेता अरबाज शेख याच्या एका व्हायरल व्हिडीओनंतर राज्यातील खाजगी रुग्णालयांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे अरबाजने त्यांना उपचारासाठी सोलापुरातल्या नोबल रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयाने त्यांच्याच मेडिकलमधून औषधे घेण्यास सांगितल्याने त्याचं बिल 40 हजार रुपयांचं झाल्याचं त्याने सांगितलं. खाजगी रुग्णालयाकडून अशा पद्धतीची लूट सुरू असल्याचा आरोप करत अरबाजने चाहत्यांकडे मदतीची विनंती केली होती. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे काही कारवाई करतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

तुकाराम मुंढेंनी दिलेला कारवाईचा इशारा

रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांसाठी आत असलेल्या फार्मसीकडूनच औषधं आणि वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा इशारा दिला होता. रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधं किंवा वैद्यकीय साहित्य खरेदी करणं हे कायद्याने बंधनकारक नाही. औषधं कुठून खरेदी करायची, हा पूर्णपणे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचा अधिकार आहे, असं ते म्हणाले होते. तसंच याचं उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. याबाबत कोणावरही रुग्णालय सक्ती करू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं.

अरबाजचा व्हिडीओ-

रुग्णालयाचं स्पष्टीकरण

अरजाब शेखचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नोबल रुग्णालयाच्या प्रमुखांनी आपली बाजू मांडली आहे. “औषधं आमच्याकडूनच घेण्याबाबत आम्ही कधीही कोणालाही अनिवार्य करत नाही. मुळात दोन दिवसांपूर्वीच त्या रुग्णाने डिस्चार्ज घेतला आहे. मात्र तरीही त्यांनी असे आरोप का केले, याबाबत कल्पना नाही. तसंच रुग्णाच्या एकूण खर्चाबाबत आम्ही त्यांना आधीच कल्पना दिलेली होती”, अशी प्रतिक्रिया नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद सय्यद यांनी दिली आहे.

रुग्णालयातील मेडिकलमधून औषधं घेतल्यानंतर बराच खर्च आल्याने आता अरबाजने त्याच्या वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं आहे. या व्हिडीओच्या अखेरीस त्याने चाहत्यांकडे आर्थिक मदतीचीही विनंती केली आहे. मला माझ्या बापाला मरताना पहायचं नाहीये, मला त्यांना काहीही करून वाचवायचं आहे, अशी भावनिक साद त्याने घातली आहे.

Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी