Tukaram Mundhe: फक्त टी-शर्ट घालून… प्रिती झिंटा, मल्लिका शेरावतबद्दल तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले!
Tukaram Mundhe: अभिनेत्री प्रिती झिंटा आणि मल्लिका शेरावत यांच्यावर तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले आहेत. एवढंच नाही तर, 'Team Tukaram Mundhe' यावर देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Tukaram Mundhe: राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धाडींचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने हाती घेतलेल्या कार्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या कामाचं कौतुक आता सर्वात स्तरातून होत आहे.अनेक सेलिब्रिटींनी देखील तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. प्रिती झिंटा, मल्लिका शेरावत, ट्विंकल खन्ना, सलमान खान यांसारख्या सेलिब्रिटींनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचं समर्थन केलं आहे.
यावेळी तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींचे आभार तर मानले, पण मोठा सल्ला देखील दिला. ‘फक्त टी-शर्ट घालणं किंवा सोशल मीडियावर कौतुक करणं पुरेसं नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने समाजात बदल घडवण्यासाठी प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे आणि योग्य मानसिकतेची गरज आहे.’, सांगायचं झालं तर, प्रिती हिने टी-शर्ट घातलेला. ज्यावर ‘Team Tukaram Mundhe’, असं लिहिलं होतं.
यावर तुकाराम मुंढे म्हणाले, ‘माझं प्रिती झिंटा यांच्यासोबत वैयक्तिकरित्या किंवा फोनवर बोलणं झालं नाही. पण त्यांनी ‘तुकाराम मुंढे टीम’ असं लिहिलं, ज्यामुळी मी त्यांचा आभारी आहे…, पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ‘समाजातील प्रत्येक क्षेत्रात चांगल्या विचारांचे लोक असतात. चांगल्या कामासाठी अशा लोकांनी एकत्र येऊन एक भव्य टीम तयार केली पाहिजे… फक्त टी – शर्ट घालून काम होणार नाही.’
मल्लिका शेरावत हिचे आभार मानत तुकाराम मुंढे म्हणाले, ‘प्रत्येकाने अन्नपदार्थांमधील भेसळ, अस्वच्छता आणि आरोग्यास हानिकारक असणाऱ्या घटकांवर करडी नजर ठेवली पाहिजे. मी माझं कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर, सर्वांची जबाबदारी आहे.’ असं देखील तुकाराम मुंढे म्हणाले आहेत.
पुढे तुकाराम मुंढे म्हणाले, ‘सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. रिल्स देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. लोक प्रेमाने आणि आदराने पाठिंबा देतात. पण अन्न सुरक्षेचा लढा यशस्वी करायचा असेल तर, जनतेने जागरुक होणं गरजेचं आहे.’
