AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा खास तुलाविधी सोहळा; सुनेच्या वजनाइतके आंबे अर्पण

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे 'बाई तुझा आशीर्वाद'. या मालिकेतील अवनीचा खास तुलाविधी सोहळा नुकताच पार पडला. यावेळी तिच्या वजनाइतके आंबे दान करण्यात आले.

'बाई तुझा आशीर्वाद' मालिकेतील अवनीचा खास तुलाविधी सोहळा; सुनेच्या वजनाइतके आंबे अर्पण
अवनीचा पार पडला खास तुलाविधी सोहळाImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 20, 2026 | 3:41 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेत दांगट कुटुंबात सुनेच्या म्हणजेच अवनीच्या रूपाने आनंदाची चाहूल लागली आहे. नव्या सुनेचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी अक्षय तृतीयेचं निमित्त साधत दांगट कुटुंबाने अवनीचा भव्यदिव्य तुलाविधी केला. ढोल-ताशे आणि लेझीम खेळत अवनीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सगळ्या कुटुंबाने मिळून तिचं औक्षण केलं. सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलेल्या तुलाविधीमध्ये अवनीच्या वजनाइतके आंबे अर्पण करण्यात आले. उपस्थित सगळ्यांसाठीच हा क्षण भारावणारा होता. सासरे आणि दिरांचं हे प्रेम पाहून अवनीच्या डोळ्यांतही आनंदाश्रू दाटले होते. प्रेम आणि आपुलकीने न्हालेला हा तुलाविधी सोहळा मालिकेतील नात्यांचा गोडवा अधोरेखित करणारा ठरला.

मराठी मालिका विश्वात नेहमीच समाजाशी निगडित आणि विचार करायला लावणारे विषय मांडणारी स्टार प्रवाह वाहिनी ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं.

‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका ठामपणे सांगते की बाई म्हणजे केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर ती घराला घर बनवणारी शक्ती आहे. ही नवी मालिका येत्या 27 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद ही अवनीची भूमिका साकारणार आहे. रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात ड्रिग्री घेतलेल्या अवनीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. सात वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ‘स्टार’ ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर गुड बाय किस, अत्तरमन अश्या अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली.

Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू