Tunisha Sharma: आत्महत्येपूर्वी तुनिशा-शिझानच्या आईमध्ये झालेली बातचित; ऑडियो क्लिप समोर

टोकाचं पाऊल उचलण्याआधी तुनिशाने शिझानच्या आईशी साधला होता संवाद; म्हणाली "मी तुम्हाला सगळं सांगेन अम्मा"

Tunisha Sharma: आत्महत्येपूर्वी तुनिशा-शिझानच्या आईमध्ये झालेली बातचित; ऑडियो क्लिप समोर
आत्महत्येपूर्वी तुनिशा-शिझानच्या आईमध्ये झालेली बातचित; ऑडियो क्लिप समोरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 12:48 PM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने डिसेंबरच्या अखेरीस सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान याच्यावर तुनिशाच्या आईने केलेल्या आरोपांचं त्याच्या कुटुंबीयांनी खंडन केलं. तसंच तिच्या आईलाच तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला. शिझानच्या कुटुंबीयांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिझानची आई, त्याचा वकील आणि दोघी बहिणी उपस्थित होत्या. शिझानची बहीण फलक नाझने माध्यमांसमोर तुनिशाची एक कथित ऑडियो क्लिपसुद्धा ऐकवली.

तुनिशा आणि शिझान खानची आई यांच्यातील संवादाची ही ऑडियो क्लिप होती. ज्यामध्ये तुनिशा रडत म्हणतेय, “तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात, खूप जास्त.. मी तुम्हाला नीट ओळखत पण नाही तरीसुद्धा तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या मनात जी गोष्ट असेल ती मी तुम्हाला सांगेन पण माहीत नाही, मला स्वत:लाही माहीत नाही की मला काय होतंय.”

हे सुद्धा वाचा

फलक नाझने सांगितलं की ही ऑडियो क्लिप 5 सप्टेंबरची आहे. त्यादिवशी तुनिशाच्या आईचा वाढदिवस होता आणि त्यांनी संजीव कौशल नावाच्या एका व्यक्तीसोबत तो वाढदिवस साजरा केला होता.

तुनिशाची ही ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी ही क्लिप फेक असल्याचंही म्हटलंय.

तुनिशा तिच्या आईचे मित्र संजीव कैशल यांना घाबरायची. या सगळ्या गोष्टींमुळे ती तणावाखाली असायची. याच कारणामुळे ती तिची मैत्रीण कंवर ढिल्लोसोबत तीन महिने राहिली. एकदा तुनिशाच्या आईने तिचा गळादेखील दाबला होता, असे धक्कादायक आरोप शिझानच्या बहिणीने केले.

तुनिशाची आई तुनिशाला बळजबरीने मालिकेच्या शूटिंगसाठी पाठवत होती. तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याकडून काम करून घेत होती, असाही आरोप शिझानच्या बहिणीने केला.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.